Varanasi येथे Veer Savarkar यांच्या नावे उभारले आहे फास्ट फूड सेंटर

Veer Savarkar : देशप्रेमी अश्वनीकुमार पांडे आणि त्यांचे सहकारी अरविंद सिंह यांनी हा फूड स्टॉल (Food Stall) चालू केला आहे.

147
Varanasi येथे Veer Savarkar यांच्या नावे उभारले आहे फास्ट फूड सेंटर
Varanasi येथे Veer Savarkar यांच्या नावे उभारले आहे फास्ट फूड सेंटर

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या विचारांनी प्रभावित होऊन वाराणसी (Varanasi) येथे त्यांच्या नावे फास्टफूड सेंटर उभारण्यात आले आहे. देशप्रेमी अश्वनीकुमार पांडे आणि त्यांचे सहकारी अरविंद सिंह यांनी हा फूड स्टॉल (Food Stall) चालू केला आहे. वाराणसी येथेही स्थानिकांचा त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.

(हेही वाचा – chalisgaon maharashtra: खाद्यप्रेमींसाठी परिपूर्ण असलेले चाळीसगाव मधील ही टॉप ५ उपहारगृह तुम्हाला माहीत आहेत का?)

सावरकरांचे नाव सर्वत्र पोहोचायला हवे – अश्वनीकुमार पांडे

याविषयी बोलताना अश्वनीकुमार पांडे म्हणाले की, मी लहानपणीपासून क्रांतीकारकांचे कार्य, त्यांचा इतिहास वाचला आहे. ज्या वेळी मी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Veer Savarkar) इतिहास वाचला, तेव्हा मला वाटले की, यांचे नाव सर्वत्र पोहोचायला हवे. त्यामुळे मी त्यांच्या नावे फास्ट फूड सेंटर उभारायचे ठरवले. स्थानिकांचा या फूड स्टॉलला चांगला प्रतिसाद लाभत आहे.

गोळी घालण्याची धमकी

या नावासाठी मला विरोधही झाला. मी हे नाव हटवावे, असे सांगणारे निनावी फोनही आले. मी त्यांचे ऐकले नाही, तर १५ दिवसांनी मला धमकीही देण्यात आली. नाव हटवले नाही, तर गोळी घालू, अशा प्रकारच्या धमक्याही देण्यात आल्या. नाव हटवणे; म्हणजे आम्हीच येथून जाण्यासारखे आहे. त्यामुळे मी नावही बदलले नाही आणि मागेही हटलो नाही. अशाच प्रकारे स्वातंत्र्यसैनिक नीराबाई यांच्याही नावे एक फूड स्टॉल उभारण्यात येणार आहे, असा निर्धार अश्वनीकुमार पांडे यांनी व्यक्त केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.