सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्ष २०२५ च्या स्वागतासाठी सगळे सज्ज असताना आता २०२४ च्या वर्षाचा सर्व क्षेत्राकडून आढावा घेतला जात आहे. घर खरेदी-विक्रीमध्ये (Property Sector) २०२४ वर्ष हे वाईट ठरले. तब्बल ४ टक्क्यांनी घर खरेदी घटली. या वर्षभरात देशातील ७ महानगरांमध्ये ४ लाख ५९ हजार ६५० घरांची विक्री झाली. त्या व्यवहारातून ५.६८ लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली.
२०२३ मध्ये एका ४ लाख ७६ हजार ५३० घरांची विक्री (Property Sector) झाली होती, त्यांची किंमत ४.८८ लाख कोटी रु. होती. मुंबईत सर्वाधिक १ लाख ५५ हजार ३३५ घरांची, तर पुण्यात ८१ हजार ९० घरांची विक्री झाली. २०२४ मध्ये मुंबईत ४ लाख १२ हजार ५२० नवीन घरे खरेदीसाठी (Property Sector) उपलब्ध झाली. २०२३मध्ये ही संख्या ४ लाख ४५ हजार ७७० होती. ही घट सात टक्के इतकी नोंदविली गेली आहे. मुंबई महानगर आणि बेंगळुरूमध्ये सर्वाधिक नवीन प्रकल्प आले. २०२४ मध्ये नव्याने आलेल्या घरांच्या साठ्यात १.५ कोटी किंमतीच्या उच्चभ्रू वर्गवारीतील घरांचा वाटा ३० टक्के इतका राहिला. त्यापाठोपाठ ४० ते ८० लाख रु. किंमतीच्या घरांचा वाटा २८ टक्के आणि ८० लाख ते १.५० कोटी रु. किंमतीच्या घरांची टक्केवारी सर्वांत कमी म्हणजे १६ टक्के इतकी राहिली. मुंबईत घरांच्या विक्रीत एक टक्का, तर बेंगळुरूमध्ये दोन टक्के वाढ नोंदविण्यात आली.
Join Our WhatsApp Community