Property Tax : मुंबई महापालिकेच्या तिजोरीत मे महिन्यांतच जमा झाला सुमारे ४८५९ कोटी रुपयांचा मालमत्ता कर

452
Property Tax : मुंबई महापालिकेच्या तिजोरीत मे महिन्यांतच जमा झाला सुमारे ४८५९ कोटी रुपयांचा मालमत्ता कर

मुंबई महापालिका प्रशासनाकडून यंदा ४८५९ कोटी ५३ लाख ६७ हजार रुपये इतका मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ४५०० कोटी रुपये कर संकलनाचे लक्ष्य होते. २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी २५ मे २०२४ हा अंतिम दिवस होता. या दिनांकापर्यंत करभरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांना दरमहा २ टक्के दंड आकारण्यात येणार आहे. (Property Tax)

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, मुंबईतील मालमत्ताधारकांकडून करसंकलन करण्यासाठी करनिर्धारण व संकलन खात्याकडून प्रयत्न करण्यात आले. २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी २५ मे २०२४ हा अंतिम दिवस होता. मालमत्ता धारकांना दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळता यावी, यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आदी माध्यमातून सातत्याने आवाहन करण्यात आले. करभरणा करण्यासाठी मालमत्ता धारकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व विभागातील नागरी सुविधा केंद्रे रविवारी, शनिवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले होते. तसेच या कालावधीत मालमत्ता करासंबंधीत अडचणींच्या निराकरणासाठी सर्व विभागांमध्ये करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. (Property Tax)

या पार्श्वभूमीवर करनिर्धारण व संकलन खात्याकडून यंदा ४८५९ कोटी ५३ लाख ६७ हजार रुपये इतका मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे. यामध्ये शहरातील १४२५ कोटी ०१ लाख ३१ हजार रुपये, पश्चिम उपनगरातील २४५५ कोटी ९० लाख ५७ हजार रुपये आणि पूर्व उपनगरातील ९६८ कोटी १३ लाख ५८ हजार रुपये तसेच शासकीय, बंदर आणि रेल्वे यांच्या अखत्यारीतील मालमत्ताच्या १० कोटी ४८ लाख २१ हजार इतक्या कर रकमेचा समावेश आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या ४५०० कोटी रुपये मालमत्ता कराच्या उद्दिष्टापेक्षा अधिक कर संकलित करण्यात आला आहे. तर, २५ मे २०२४ रोजी एकाच दिवसात १७०.५९ कोटी रुपयांचा मालमत्ता कर संकलित करण्यात आला. (Property Tax)

(हेही वाचा – Bogus Calls : भारतीय नागरिकांची आंतरराष्ट्रीय फोन कॉल करून फसवणूक, काय काळजी घ्याल?)

विभागनिहाय मालमत्ता कर संकलनाची आकडेवारी
  • ए विभाग : २१४ कोटी ९१ लाख ४९ हजार रुपये.
  • बी विभाग : ३३ कोटी ९५ हजार ०२ लाख रुपये.
  • सी विभाग : ६१ कोटी २२ लाख ४९ हजार रुपये.
  • डी विभाग : १९३ कोटी ०२ लाख ४३ हजार रुपये.
  • ई विभाग : १०५ कोटी २६ लाख ३४ हजार रुपये.
  • एफ दक्षिण विभाग : १०० कोटी २६लाख ३४ हजार रुपये.
  • एफ उत्तर विभाग : ११४ कोटी १९ लाख २८ हजार रुपये.
  • जी दक्षिण विभाग : ४१९ कोटी ५३ लाख ८९ हजार रुपये.
  • जी उत्तर विभाग : १८२ कोटी ७४ लाख ५९ हजार रुपये.
  • एच पूर्व विभाग : ४५६ कोटी ६६ लाख ६८ हजार रुपये.
  • एच पश्चिम विभाग : ३०१ कोटी २४ लाख ८१ हजार रुपये.
  • के पूर्व विभाग : ४६३ कोटी ५८ लाख ०१ हजार रुपये.
  • के पश्चिम विभाग : ४०६ कोटी ८१ लाख ४२ हजार रुपये.
  • पी दक्षिण विभाग : २७० कोटी ४० लाख २५ हजार रुपये.
  • पी उत्तर विभाग : १८० कोटी ७२ लाख २२ हजार रुपये.
  • आर दक्षिण विभाग : १४३ कोटी ८९ लाख ७६ हजार रुपये.
  • आर मध्य विभाग : १७० कोटी १९ लाख ९८ हजार रुपये.
  • आर उत्तर विभाग : ६२ कोटी ३७ लाख ४४ हजार रुपये.
  • एल विभाग विभाग : २११ कोटी ३० लाख ४५ हजार रुपये.
  • एम पूर्व विभाग : ७३ कोटी ३१ लाख ५५ हजार रुपये.
  • एम पश्चिम विभाग : १०३ कोटी ३४ लाख ११ हजार रुपये.
  • एन विभाग विभाग : १६१ कोटी ६१ लाख ९८ हजार रुपये.
  • एस विभाग विभाग : २८२ कोटी ३० लाख ४४ हजार रुपये.
  • टी विभाग विभाग : १३६ कोटी २५ लाख ०५ हजार रुपये. (Property Tax)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.