पुढील आठ दिवसांत या माध्यमातून स्वीकारणार नाही मालमत्ता कराची रक्कम

99
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता कराची संगणकीय प्रणाली अद्ययावत (O.S. Upgradation) करण्याची कार्यवाही सुरू आहे. या कामाचा एक भाग म्हणून शुक्रवार ३ फेब्रुवारी २०२३ रात्री १२.०१ वाजल्यापासून (२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ११.५९ नंतर) ते शुक्रवार १० फेब्रुवारी २०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत मालमत्ता करप्रणाली कामकाजासाठी उपलब्ध राहणार नाही. या कालावधीत मालमत्ता कराचा भरणा धनादेश, डिमांड ड्राफ्टद्वारे करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
येत्या ३ फेब्रुवारीपासून पुढील कालावधी करता मालमत्ता कर प्रणाली बंद राहणार असल्याने, ज्या करदात्यांना या कालावधीत आपल्या मालमत्ता करांचा भरणा करावयाचा असल्यास त्यांनी आपल्या संबंधित विभाग कार्यालयातील करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी/कर्मचारी यांच्याकडे भरणा रकमेचे धनादेश / डिमांड ड्राफ्ट सुपूर्द करुन त्याची पोचपावती घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
मालमत्ता कर प्रणाली बंद राहणार असल्याने करदात्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल महानगरपालिका प्रशासन दिलगिरी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.