Property Tax Arrears : न्यू शरीन टॉकिजच्या थकबाकीप्रकरणी लिलावाची नोटीस जारी

दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात आले.

248
Property Tax : मुंबई महापालिकेच्या तिजोरीत मे महिन्यांतच जमा झाला सुमारे ४८५९ कोटी रुपयांचा मालमत्ता कर
मालमत्ता करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात मुंबई महानगरपालिकेकडून आता कठोर कारवाई केली जात आहे. या आठवड्यात महानगरपालिका प्रशासनाकडून विविध विभागांमधील २४ मालमत्तांवर जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण चार जेसीबी, एक पोकलेनसह विविध प्रकारच्या वस्तू आणि साहित्य जप्त करण्यात आले. तर, वरळी येथील शुभदा गृहनिर्माण संस्थेला ३५.९४ कोटी रुपयांचा करभरणा करण्यासाठी ४८ तासांच्या मुदतीची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच जी दक्षिण विभागातील न्यू शरिन टॉकीजवरील ६ कोटी ४७ लाख रुपयांच्या थकीत करप्रकरणी लिलावाची नोटीस जारी करण्यात आली. (Property Tax Arrears)
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, मुंबईतील मालमत्ताधारकांकडून करसंकलन करण्यासाठी करनिर्धारण व संकलन खात्याकडून प्रयत्न सुरू आहेत. दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात आले. परंतु, देय दिनांक जवळ येऊनही करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. (Property Tax Arrears)
याच पार्श्वभूमीवर या आठवड्यात महानगरपालिकेच्या ई, डी, जी दक्षिण, पी उत्तर, एच पूर्व, एम पश्चिम, एम पूर्व, एफ उत्तर या विभागांमधील करधारकांच्या मालमत्तांवर मुंबई महानगरपालिका अधिनियम-१८८८ च्या कलम २०५ नुसार, जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली. एच पूर्व विभागातील जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट लिमिटेडच्या कास्टिंग यार्डवरील ८० कोटी रुपये, जी दक्षिण विभागातील वरळी येथील शुभदा गृहनिर्माण संस्थेवरील ३५.९४ कोटी, रेनिसन्स ट्रस्टचे ६.७२ कोटी रुपयांच्या थकीत करप्रकरणी कारवाई सुरू करण्यात आली आहे. शुभदा गृहनिर्माण संस्थेला थकीत रकमेचा भरणा करण्यासाठी ४८ तासांच्या कालावधीची नोटीस बजावण्यात आली. तर, रेनिसन्स ट्रस्टचे चार जेसीबी आणि एक पोकलेन संयंत्र जप्त करण्यात आले. (Property Tax Arrears)
जी दक्षिण विभागातील न्यू शरीन टॉकीजवरील ६ कोटी ४७ लाख रुपयांच्या थकीत करप्रकरणी लिलावाची नोटीस जारी करण्यात आली. पी उत्तर विभागातील मालाड येथील शांतीसागर रिअॅल्टी प्रायव्हेट लिमिटेडचे भूखंड (१.६५ कोटी), मेसर्स लोक हाऊसिंग अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेडचे भूखंड (३.९१ कोटी), चेंबूर येथील मेसर्स जी. ए. बिल्डर्सचे भूखंड (१.०५ कोटी), ओसवाल हाईट्सचे व्यावसायिक गाळे (२६.४८लाख), फ्लोरा अव्हेन्यूचे व्यावसायिक गाळे (९२.४२ लाख), मेसर्स अरिहंत रिअॅल्टर्सचे भूखंड (१.९६ कोटी), ई विभागातील मेसर्स प्रभातचा व्यावसायिक गाळा (७२ लाख), हेक्स रिअॅल्टर्सचा व्यावसायिक गाळा (१.१२ कोटी), पी उत्तर विभागातील मालवणी येथील डॉटम रिअॅल्टीचे भूखंड (१३.०६ कोटी), मालाड येथील क्रिसेंट आदित्य रिअॅल्टर्स प्रा. लि. चा भूखंड (२.५० कोटी), एच पूर्व विभागातील एन. जे. फिनस्टॉक प्रा. लि. चा व्यावसायिक गाळा (४५.८३ लाख), पी उत्तर विभागातील समर्थ डेव्हलपर्सचा भूखंड (२.३१ कोटी), अजंता कर्मवीर ग्रुपचा भूखंड (२.०५ कोटी), डी विभागातील श्रीनीजू इंडस्ट्रीजचे व्यावसायिक गाळे (३.७७ कोटी), एम पश्चिम विभागातील नेत्रावती गृहनिर्माण संस्थेचे भूखंड (६७.५१ लाख), विजया गृहनिर्माण संस्थेचे भूखंड (१.६८ कोटी), जयश्री डी. कावळे (१.६५ कोटी), ई विभागातील सय्यद अकबर हुसैन यांचा व्यावसायिक गाळा (५८.१३ लाख), एफ उत्तर विभागातील बी. पी. टेक्नो प्रॉडक्ट्स प्रा. लि. यांचे व्यावसायिक गाळे (४१.०५ लाख) या मालमत्तांवर जप्ती व अटकावणीची कारवाई करण्यात आली. कारवाई झालेल्या मालमत्ताधारकांनी पुढील पाच दिवसांच्या आत करभरणा न केल्यास जप्त केलेल्या मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. (Property Tax Arrears)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.