Property Tax BMC : जुन्या थकबाकीदारांना टार्गेट करत महापालिकेने वसूल केला वर्ष अखेर ३ हजार १९६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर

निर्धारित कालावधीत नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करता यावा, यासाठी साप्‍ताहिक तसेच सार्वजनिक सुट्टींच्‍या दिवशी नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्‍यात आली. मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्‍यात आले. तसेच, मागील थकबाकी वसुलीसाठी परिश्रम घेण्‍यात आले.

666
BMC : पुन्हा एकदा महापालिकेत महिला अधिकाऱ्यावर अन्याय...
BMC : पुन्हा एकदा महापालिकेत महिला अधिकाऱ्यावर अन्याय...

मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची आर्थिक वर्षातील अखेरच्या दिवसापर्यंत म्हणजे ३१ मार्च २०२४ च्या रात्री बारा वाजेपर्यंत ३ हजार १९५ कोटी ९१ लाख ११ हजार रूपये एवढी कराची रक्कम वसुली करण्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. चालू आर्थिक वर्षात सुमारे ४५०० कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य होते. परंतु सुधारित मालमत्ता कराची देयके १५ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आल्याने निश्चित केलेल्या कराच्या आकारणीची रक्कम होणे अशक्य होते. त्यामुळे महापालिकेने आता जुन्या थकबाकीदारांना गाठून त्यांच्याकडून ही थकीत रक्कम वसूल करत हे लक्ष्य सुमारे ३२०० हजार कोटींपर्यंत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. (Property Tax BMC)

करनिर्धारण व संकलन विभागातर्फे आर्थिक वर्ष २०२३-२०२४ ची सुधारित मालमत्ता कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस निर्गमित झाल्यानंतर निर्धारित कालावधीत कर भरण्याबाबत नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात आले. निर्धारित कालावधीत नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करता यावा, यासाठी साप्‍ताहिक तसेच सार्वजनिक सुट्टींच्‍या दिवशी नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्‍यात आली. मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्‍यात आले. तसेच, मागील थकबाकी वसुलीसाठी परिश्रम घेण्‍यात आले. परिणामी, ३ हजार १९५ कोटी ९१ लाख ११ हजार रूपयांचा कर वसुली करणे शक्य झाल्याचे सहआयुक्त सुनील धामणे यांनी सांगितले. (Property Tax BMC)

अशी झाली विक्रमी वसुली

दिनांक १९ मार्च २०२४ रोजी एकाच दिवसात तब्बल १०० कोटी रुपये, २८ मार्च २०२४ रोजी ३०४ कोटी रूपये, २९ मार्च २०२४ रोजी १७१ कोटी रूपये, ३० मार्च २०२४ रोजी १७१ कोटी रूपये आणि ३१ मार्च २०२४ रोजी १९० कोटी ३४ लाख रुपयांचे विक्रमी संकलन करण्‍यात करनिर्धारण व संकलन विभागाला यश आले. (Property Tax BMC)

(हेही वाचा – RBI 90th Anniversary: आरबीआय भारताला वैश्विकस्तरावर घेऊन जाऊ शकतं, पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास)

सर्वाधिक वसुली एच पूर्व विभागात

दिनांक १ एप्रिल, २०२३ ते ३१ मार्च, २०२४ या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक मालमत्ता कर संकलन हे ‘एच पूर्व’ विभागामध्ये रुपये ३३६.४५ कोटी इतके झाले आहे. त्या खालोखाल ‘के पूर्व ’ विभागामध्ये ३१७.४८ कोटी रुपये इतकी, ‘जी दक्षिण’ विभागामध्ये २५७.११ कोटी रुपये मालमत्ता कर संकलन झाले आहे (Property Tax BMC)

पश्चिम उपनगरातून अधिक कर वसुली

मुंबईच्या शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तिन्ही भागातील मालमत्ता कर संकलनाचा विचार केल्यास सर्वाधिक कर संकलन हे पश्चिम उपनगरांमध्ये १,५९०.०९ कोटी रुपये, शहर भागात ९१७.०५ कोटी रुपये आणि पूर्व उपनगरांमध्ये ६७८.४२ कोटी रुपये इतके मालमत्ता कर संकलन झाले आहे. (Property Tax BMC)

मुंबईत ३ लाख ५६ हजार ६५२ मालमत्ता धारकांना सुट

मुंबईत एकूण मालमत्तांची संख्‍या ९ लाख ५५ हजार ३८ इतकी आहे. त्‍यापैकी ५०० चौरस फूट (४६.४५ चौरस मीटर) व त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी इमारती/निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. या सूट दिलेल्या मालमत्ता धारकांची संख्‍या ३ लाख ५६ हजार ६५२ इतकी आहे. तर, उर्वरित ५ लाख ९८ हजार ३८६ मालमत्तांना कर आकारणी केली जाते. सन २०२३-२४ मध्‍ये २ लाख ५३ हजार ६०५ मालमत्ता धारकांनी मिळून एकूण वर्षात ३ हजार १९५ कोटी ९१ लाख ११ हजार रूपयांचा कर भरणा केला आहे. (Property Tax BMC)

सुधारित देयके निर्गमित केल्यानंतरच्या अल्पावधीत केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे, सहाय्यक आयुक्त (कर निर्धारण व संकलन) महेश पाटील यांनी करनिर्धारण व संकलन खात्यातील अधिकारी, कर्मचारी आणि विभाग कार्यालय स्तरावर कार्यरत सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना उर्वरित कर संकलनासाठी पाठपुरावा सुरु ठेवण्याच्या सुचनाही केल्या आहेत. (Property Tax BMC)

(हेही वाचा – IPL 2024 Hardik Pandya : हार्दिक पांड्याला ट्रोलिंग करणाऱ्यांना खरंच मुंबई पोलीस स्टेडिअम बाहेर काढणार?)

आर्थिक वर्षातील (२०२३-२०२४) प्रशासकीय विभागनिहाय मालमत्ता कर संकलन-

१) ए विभाग – १५३ कोटी ०१ लाख रूपये
२) बी विभाग – २२ कोटी ३३ लाख रूपये
३) सी विभाग – ४१ कोटी ९३ लाख रूपये
४) डी विभाग – ११४ कोटी ४१ लाख रूपये
५) ई विभाग – ६९ कोटी ४६ लाख रूपये
६) एफ दक्षिण विभाग – ५७ कोटी ८५ लाख रूपये
७) एफ उत्तर विभाग – ६९ कोटी २३ लाख रूपये
८) जी दक्षिण विभाग – २५७ कोटी ११ लाख रूपये
९) जी उत्तर विभाग – १३१ कोटी ७२ लाख रूपये
१०) एच पूर्व विभाग – ३३६ कोटी ४५ लाख रूपये
११) एच पश्चिम विभाग – १८५ कोटी ५३ लाख रूपये
१२) के पूर्व विभाग – ३१७ कोटी ४८ लाख रूपये
१३) के पश्चिम विभाग – २३८ कोटी २८ लाख रूपये
१४) पी दक्षिण विभाग – १६७ कोटी २१ लाख रूपये
१५) पी उत्तर विभाग – ११५ कोटी ०३ लाख रूपये
१६) आर दक्षिण विभाग – ८५ कोटी ७४ लाख रूपये
१७) आर मध्य विभाग – १०५ कोटी ०७ लाख रूपये
१८) आर उत्तर विभाग – ३९ कोटी ३० लाख रूपये
१९) एल विभाग – १३९ कोटी ३४ लाख रूपये
२०) एम पूर्व विभाग – ५५ कोटी ०८ लाख रूपये
२१) एम पश्चिम विभाग – ७३ कोटी रूपये
२२) एन विभाग – १०३ कोटी ०८ लाख रूपये
२३) एस विभाग – २२६ कोटी २२ लाख रूपये
२४) टी विभाग – ८१ कोटी ७० लाख रूपये
२५) शासन मालमत्‍ता – १० कोटी ३५ लाख रूपये

एकूण – ३ हजार १९५ कोटी ९१ लाख ११ हजार रूपये (Property Tax BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.