आता मुंबईकरांना किती मोजावा लागणार मालमत्ता कर? वाचा

68

मुंबई महापालिकेच्यावतीने आकारल्या जाणाऱ्या मालमत्ता करात यंदा कोणतीही वाढ होणार नाही. महापालिकेच्यावतीने आकारल्या जाणाऱ्या भांडवली मूल्य आधारित करप्रणालीमध्ये पाच वर्षांसाठी वाढ प्रस्तावित होती. कोविडमुळे मागील वर्षी करात वाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे या वर्षापासून करात वाढ प्रस्तावित होती. परंतु कोविडमुळे मालमत्ता करात कोणतीही वाढ करण्यात येणार नसून, जुन्या दराप्रमाणोच आता मालमत्ता कर आकारला जाणार आहे.

लॉकडाऊनमुळे कर सुधारणा नाही

मुंबई महापालिकेच्यावतीने आकारल्या जाणाऱ्या मालमत्ता कराची आकारणी १ एप्रिल २०१० पासून भांडवली मूल्य करप्रणालीनुसार लागू करण्यात आली आहे. त्यानुसार दर पाच वर्षांनी मालमत्ता करात सुधारणा करण्यात येते. त्याप्रमाणे १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी भांडवली मूल्य सुधारणा करणे आवश्यक असून, त्या अनुषंगाने नियमावलीत सुधारणा करणे क्रमप्राप्त आहे. परंतु कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे ही सुधारणा १ एप्रिल २०२० पासून करणे शक्य झाले नाही. त्यामुळे मालमत्ता कर सुधारणा एक वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आली होती. पर्यायी सन २०२० -२०२१ या आर्थिक वर्षात कोणतीही दरवाढ न करता मालमत्ता कराची देयके पाठवण्यात आली होती. ही देयके शासकीय अध्यादेशामुळे पुढील चार वर्षांसाठी म्हणजे ३१ मार्च २०२५ पर्यंत लागू असतील, असे म्हटले होते.

(हेही वाचाः बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींसोबत महापालिकेचा ‘हा’ मोठा निर्णय!)

स्थायी समितीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव

कोविडच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे महापालिकेच्या अर्थव्यवस्थेवर झालेला विपरित परिणाम विचारात घेता, मालमत्ता कर धारकांवर अतिरिक्त बोजा पडू नये यासाठी मालमत्ता कराच्या दरामध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

किती आहे जल कर?

सध्याच्या धोरणानुसार शहर भागातील ज्या ग्राहकांकडे मीटरशिवाय जलजोडणी आहे, अशांना मालमत्ता कर आकारला जात नाही. तसेच उपनगरांमधील मीटरशिवाय जलजोडणी आहे, त्या मालमत्तांना जल कराची आकारणी केली जात नाही. मालमत्ता करांच्या देयकांमध्ये निवासी वापराच्या बांधकामांना ०.२५३ टक्के जल कर आकारला जातो, तर वाणिज्यिक तथा औद्योगिक वापरासाठी ०.६२० टक्के जल कर आकारला जातो. याशिवाय मीटर असलेल्या जलजोडणीच्या ग्राहकांना संपूर्ण मुंबईत जल कर आणि मलनि:स्सारण कर आकारला जात नाही. निवासी वापरासाठी ०.१६३ टक्के तर वाणिज्यिक तथा औद्योगिक वापरासाठी ०.४०० टक्के एवढा मलनिःस्सारण लाभ कर आकारला जातो.

(हेही वाचाः धक्कादायक! राज्यात तिसरी लाट आली, सुरुवात नागपुरातून!)

सध्या महापालिकेच्यावतीने ५०० चौरस फुटांच्या घरांना आकारण्यात येणाऱ्या करांच्या देयकांमध्ये सर्वसाधारण कर वगळून, इतर करांसह देयके जारी केली जातात. तर ५०० चौरस फुटांच्या घरांना सन २०१५-२०२०ला लागू असलेल्या दरानुसारच मागील वर्षी कर आकारला होता. त्याचप्रमाणे चालू आर्थिक वर्षात जुन्या दरानुसारच कर आकारला जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.