Property Tax : मुंबई महापालिकेकडून ६८ टक्के मालमत्ता कराची वसुली

327
Property Tax : मुंबई महापालिकेकडून ६८ टक्के मालमत्ता कराची वसुली
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मागील १ एप्रिल २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या नऊ महिन्यांत एकूण ५ हजार ८४७ कोटी ६८ लाख रुपये एवढा महसूल मालमत्ता कराच्या (Property Tax) स्वरूपात जमा करण्यात आला आहे. एकूण वसुली करण्यात येणाऱ्या कराच्या तुलनेत ६८ टक्के मालमत्ता कराची वसुली ३१ डिसेंबर पर्यंत झाली आहे. सोमवारी ३० डिसेंबर २०२४ रोजी एका दिवसात १७३ कोटी लाख ५९ लाख रूपये तर मंगळवारी ३१ डिसेंबर २०२४ रोजी २६० कोटी २८ लाख रूपयांचा कर भरणा मालमत्ताधारकांनी केला आहे.

महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्‍या मार्गदर्शनाखाली आणि सहआयुक्‍त विश्‍वास शंकरवार यांच्‍या नेतृत्‍वाखाली करनिर्धारण आणि संकलन खाते कार्यरत आहे. कर संकलनाचे उद्दिष्ट्य साध्‍य करण्‍यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्‍यात आल्‍या आहेत.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir: ख्रिस्ती नववर्षाच्या पहिल्या दिवशी ‘इतक्या’ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन)

मागील आर्थिक वर्षांत म्हणजे सन २०२३-२४ मधील मालमत्ता कर (Property Tax) भरण्याची अंतिम मुदत ही २५ मे २०२४ पर्यंत होती. त्यामुळे मागील आर्थिक वर्षातील सुमारे १ हजार ६६० कोटी रुपये रक्कम देखील यात समाविष्ट आहे. याचाच अर्थ चालू आर्थिक वर्षाचे (२०२४-२५) कर संकलन हे ४ हजार १८७ कोटी १९ लाख रुपये इतके झाले आहे. चालू आर्थिक वर्षाचे (२०२४-२५) मालमत्ता कर संकलन उद्दिष्ट्य हे सुमारे ६ हजार २०० कोटी रुपये इतके आहे. त्या तुलनेत आतापर्यंत ६८ टक्के कर संकलन झाले आहे.

मुंबईतील मालमत्ताधारकांना दिलेल्या मुदतीत कर भरणा करता यावा, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाच्यावतीने वेळोवेळी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. मालमत्ताधारकांच्या सोयीसाठी शनिवारीही प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालय तसेच नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्यात आली होती. तसेच यासंबंधीत अडचणींचा निपटारा करण्यासाठी कर निर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी अविरत कार्यरत आहेत. (Property Tax)

(हेही वाचा – Union Carbide चा विषारी कचरा तब्बल 40 वर्षांनंतर उचलला)

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी अंतिम देय ३१ डिसेंबर २०२४ हा होता. कर भरणा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय, सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालयांमधील नागरी सुविधा केंद्रे रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे सोमवारी ३० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून तर रात्री १० वाजेपर्यंत या कालावधीत १७३ कोटी ५९ लाख रूपये आणि मंगळवारी ३१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजेपासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत या वेळेत २६० कोटी २८ लाख रूपयांचा मालमत्ता कर नागरिकांनी भरला. (Property Tax)

(हेही वाचा – Mumbai Goa Highway: जानेवारीच्या ‘या’ तारखेपासून पूर्ण क्षमतेने चालू होणार कशेडी बोगदा)

ठळक मुद्दे
  • दिनांक १ डिसेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या एकाच महिन्यात २ हजार ५०१ कोटी ०७ लाख रूपयांचा विक्रमी कर वसूल
  • दिनांक १ एप्रिल २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत शहर विभागात १ हजार ७७४ कोटी ४३ लाख रूपयांचा कर जमा
  • दिनांक १ एप्रिल २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत पूर्व उपनगरे विभागात १ हजार ०९१ कोटी १० लाख रूपयांचे कर जमा
  • दिनांक १ एप्रिल २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत पश्चिम उपनगरे विभागात २ हजार ९७९ कोटी ४५ लाख रूपयांचे कर संकलन

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.