Property Tax : मुंबईकरांना २५ मे नंतर सामोरे जावे लागणार दोन टक्क्यांच्या दंडाला

1075
Property Tax : मुंबई महापालिकेच्या तिजोरीत मे महिन्यांतच जमा झाला सुमारे ४८५९ कोटी रुपयांचा मालमत्ता कर

मुंबई महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराची (Property Tax) अंतिम देय तारीख जवळ येऊनही अद्यापही करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांकडे अखेरचे तीन दिवस उरले आहेत. या तीन दिवसांमध्ये जर मालमत्ता कराची रक्कम न भरल्यास कराच्या एकूण रकमेवर दोन टक्क्यांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे अशा मालमत्ताधारकांनी २५ मे २०२४ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत करभरणा न केल्यास त्यानंतर त्यांच्या थकीत करा रकमेवर दरमहा २ टक्के दंड आकारण्यात येणार आहे. (Property Tax)

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, मुंबईतील मालमत्ताधारकांकडून करसंकलन करण्यासाठी करनिर्धारण व संकलन खात्याकडून प्रयत्न सुरू आहेत. दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात आले. (Property Tax)

(हेही वाचा – Delhi Bomb Threat: केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कार्यालयात ‘बॉम्ब’ ठेवल्याचा ईमेल)

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा (Property Tax) करण्याचे अंतिम देय शनिवार २५ मे २०२४ आहे. या मुदतीत करभरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांच्या थकीत करावर दरमहा २ टक्के दंड आकारला जाईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे. करभरणा करण्याचा अंतिम देय दिनांकापर्यंतचा कालावधी लक्षात घेता नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून (Municipal Administration) गुरुवारी २३ आणि शुक्रवारी २४ मे २०२४ रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत तसेच शनिवारी २५ मे २०२४ रोजी सकाळी ८ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत मालमत्ता करासंबंधीत अडचणींच्या निराकरणासाठी सर्व विभागांमध्ये करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असतील. त्यामुळे अद्यापही करभरणा न केलेल्या नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्तासंबंधी कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वतीने करण्यात येत आहे. (Property Tax)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.