Property Tax : डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मालमत्ता कराची वसुली ५८ टक्के

803
Property Tax : डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मालमत्ता कराची वसुली ५८ टक्के
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराची (Property Tax) वसुली करण्यात येत असले तरी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत केवळ ५८ टक्के मालमत्ता कराची वसुली झाली आहे. मात्र, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी पुढाकार घेत तसेच सातत्याने बैठका घेऊन या कर वाढीसाठी प्रयत्न केल्याने थकीत आणि मोठ्या थकबाकीदारांना टार्गेट करत याची वसुली केल्याने महापालिकेला निश्चित केलेल्या रकमेच्या ५८ टक्के मालमत्ता कराची रक्कम वसुल करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने सन २०२४-२५ या कालावधीमध्ये मालमत्ता कर (Property Tax) वसुलीचे सुमारे ६ हजार २०० कोटी रुपयांचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले होते. त्यातुलनेत या आर्थिक वर्षांत ३ हजार ५८२ कोटी ६७ लाख रुपये एवढा मालमत्ता कराची रक्कम वसुली झाली आहे. मागील ९ महिन्यात म्हणजे १ एप्रिल २०२४ पासून ते २६ डिसेंबर २०२४ पर्यंत एकूण कर संकलन ५ हजार २४३ कोटी १६ लाख रुपये एवढे करण्यात आले आहे. मागील आर्थिक वर्ष म्हणजे २०२३-२४ मधील मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत ही २५ मे २०२४ पर्यंत होती. त्यामुळे मागील आर्थिक वर्षातील सुमारे १ हजार ६६० कोटी रुपये रक्कमही यात समाविष्ट आहे. याचाच अर्थ विद्यमान आर्थिक वर्षात म्हणजे २०२४-२५ मधील कराची वसुली ही ३ हजार ५८२ कोटी ६७ लाख रुपये इतके झाले आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांतील मालमत्ता कराच्या एकूण देयकांच्या रकमेच्या तुलनेत आतापर्यंत आतापर्यंत ५८ टक्के कराची वसुली झाली आहे.

(हेही वाचा – Uttar Pradesh मध्ये गोरक्षकांनी केली १०० गाईंची तस्करांच्या तावडीतून सुटका)

महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार आणि तत्कालिन सहआयुक्त सुनील धामणे आणि विद्यमान उपायुक्त विश्वास शंकरवार मार्गदर्शनाखाली तत्कालिन सहायक आयुक्त महेश पाटील आणि विद्यमान सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

मालमत्ता कराची (Property Tax) आकारणी मागील वर्षीप्रमाणे आकारण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे जुन्याच दराप्रमाणे मालमत्ता कराची देयके पाठवण्यात आली आहे. मात्र, ग्राहकांना याची देयके पाठवण्यात आली असली तरी तोवर कराची वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी पुढाकार घेत थकबाकीदारांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जुन्या थकबाकीदारांकडून कराची वसुली होत असल्याने मालमत्ता कराची वसुलीची डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जास्त झाली असून पुढील तीन महिन्यांमध्ये प्रत्येक वर्षी ही वसुली अधिक प्रमाणात होत असल्याने प्रशासनाने निश्चित केलेल्या रकमेपेक्षा अधिक कराची वसुली होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचा – Air Pollution : मुंबईतील रस्ते ब्रशिंग आणि धुण्यासाठी १०० टँकरसह फौजफाटा सज्ज)

वर्षांच्या शेवटच्या दिवशी १२ वाजेपर्यंत कर भरण्याची सुविधा

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर (Property Tax) भरण्यासाठी महानगरपालिकेचे मुख्यालय, सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) कार्यालयांमधील नागरी सुविधा केंद्रे कर भरण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. सोमवारी ३० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून तर रात्री १० वाजेपर्यंत आणि मंगळवारी ३१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कर भरण्यासाठी नागरी सुविधा केंद्रे सुरु राहणार आहेत. कर भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्ता कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.