Property Tax : विक्रमी मालमत्ता कर वसूल; करनिर्धारण आणि संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांचा आयुक्त्तांच्या हस्ते गौरव

3750
Property Tax : विक्रमी मालमत्ता कर वसूल; करनिर्धारण आणि संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांचा आयुक्त्तांच्या हस्ते गौरव
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाकडून आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ६ हजार १९८ कोटी ०५ लाख रुपये इतक्या रकमेचा मालमत्ता कर (Property Tax) संकलन करण्यात आले आहे. ही आजवरची विक्रमी कामगिरी आहे. ही कामगिरी बजावणारे करनिर्धारण व संकलन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मुंबईकर नागरिकांना दर्जेदार नागरी सेवा-सुविधा पुरविण्यासाठी हा उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत आहे. त्यामुळे, कायदा आणि नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांना त्रास न होता यापुढेही कर संकलनाची कारवाई अधिक प्रभावीपणे करावी, असे आवाहनही गगराणी यांनी यावेळी केले.

महानगरपालिका मुख्यालयात बुधवारी ९ एप्रिल २०२५ रोजी हा छोटेखानी सत्कार समारंभ पार पडला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार, करनिर्धारक व संकलक गजानन बेल्लाळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

New Project 2025 04 09T193133.704

(हेही वाचा – P. L. Deshpande Maharashtra Kala Academy मधील नवीन दृकश्राव्य संकुलाचे “स्वरगंधर्व सुधीर फडके” नामकरण)

मुंबई महानगरपालिकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ६ हजार २०० कोटी रुपये मालमत्ता कर (Property Tax) संकलनाचे उद्दिष्ट ठेवले होते. करनिर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे तसेच मुंबईकर नागरिकांच्या सहकार्याने मुंबई महानगरपालिकेने या आर्थिक वर्षात २६ मे २०२४ ते ३१ मार्च २०२५ या निर्धारित कालावधीदरम्यान ६ हजार १९८ कोटी ०५ लाख रुपये इतके मालमत्ता कर संकलन केले. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ९९.९७ टक्के इतके आहे. सोबतच, अतिरिक्त दंडाच्या स्वरुपात १७८ कोटी ५० हजार रुपयेही संकलित करण्यात आले आहेत.

New Project 2025 04 09T193253.047

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या, संरक्षणात्मक किंवा नकारात्मक भूमिका न घेता करनिर्धारण व संकलन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यंदा अत्यंत प्रभावीपणे मालमत्ता कर संकलनाचे कार्य केले. निर्धारित केलेले उद्दिष्ट साध्य करू शकतो, हा विश्वासही सर्वांनी सार्थ ठरवला. त्यामुळे, प्रत्येक अधिकारी, कर्मचारी अभिनंदनास पात्र आहे, असे गौरवोद्गार जोशी यांनी काढले. मालमत्ता कर (Property Tax) संकलनातील ही आजवरची विक्रमी कामगिरी आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर उद्दिष्टापेक्षाही अधिक कर संकलन करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा बुधवारी गौरव करण्यात आला. याशिवाय, अन्य ९ सहायक करनिर्धारक व संकलकांनाही प्रशस्तिपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले.

New Project 2025 04 09T193352.256

(हेही वाचा – एसटीच्या नव्या बसगाड्या सर्व आगारांना द्या; परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा आदेश)

खालील सहायक कर निर्धारक व संकलकांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे : 

विवेक राऊळ (आर मध्य विभाग, ११७ टक्के)

अनुप्रिया जाधव (सी विभाग, ११२.८१ टक्के)

हृदयनाथ गोसावी (के पूर्व विभाग, ११२.८१ टक्के)

राजू काठे (एफ उत्तर विभाग, ११२ टक्के)

महेश साळगावकर (एन विभाग, १११.९३ टक्के)

अशोक नाईक (एम पश्चिम विभाग, १११ टक्के)

दत्तात्रय गिरी (एफ दक्षिण विभाग, ११०.८६ टक्के)

उमाकांत वैष्णव (एम पूर्व विभाग, ११०.६१ टक्के)

प्रसाद पेडणेकर (ए विभाग, १०६.६९ टक्के)

अनिल साळगावकर (एल विभाग, १०५.०९ टक्के)

सूर्यकांत गवळी (जी उत्तर विभाग, १०४.५३ टक्के)

दीपक गायकवाड (एस विभाग, १०४.४५ टक्के)

धर्मेंद्र लोहार (टी विभाग, १०१.३६ टक्के)

संतोष ठाकूर (डी विभाग, १००.९१ टक्के)

दिलीपकुमार साळुंखे (आर उत्तर विभाग, १००.८६ टक्के)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.