-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराची (Property Tax) वसुलीसाठी प्रशासनाने कंबर कसली असून २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ८१ टक्के कर वसुलीचे टार्गेट पूर्ण करता आलेले आहे. त्यामुळे उर्वरीत १९ टक्क्यांच्या कराची वसुली येत्या महिन्यांत पूर्ण करून महापालिका प्रशासन निश्चित केलेला कर वसूल करून महसूल प्राप्तीचे लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ६ हजार २०० कोटी रूपये कर संकलन उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्या दृष्टीने विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू आहे. २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत महापालिकेच्यावतीने ५००९.३१ कोटी रुपयांच्या कराची वसुली केली आहे. वर्षभराच्या या कराच्या वसुलीच्या तुलनेत हे प्रमाण ८१ टक्के एवढे आहे
(हेही वाचा – महिला सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी IPS अधिकारी नियुक्त करण्यात येणार; Pratap Sarnaik यांची माहिती)
२६ मे २०२४ ते १२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ४ हजार ८२३ कोटी रूपयांचे कर गोळा झाला होता. त्यामुळे त्यावेळी ३१ मार्च २०२५ पर्यंत उर्वरित १ हजार ३७७ कोटी रूपयांचा कर संकलन (Property Tax) करण्याचे लक्ष्य होते. परंतु आता हे लक्ष्य ११९० कोटी रुपयांएवढे आहे. सर्वसाधारणपणे वर्षाच्या शेवटच्या म्हणजे मार्च महिन्यात सर्वाधिक कराची वसुली होते. त्यामुळे मार्च महिन्यात उर्वरीत १९ टक्के कराची वसुली केली जाणे शक्य असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार आणि सहआयुक्त (कर निर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत मालमत्ता धारकांकडून कर जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व संबंधितांनी दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे. परंतु, कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे मार्च महिन्यात अशाप्रकारची कारवाई हाती घेऊन जास्तीत जास्त कराची (Property Tax) वसुली पूर्ण केली जाईल. महापालिकेने निश्चित केलेले लक्ष्य ३१ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होईल, परंतु जुने थकबाकीदारांकडूनही कर गोळा करण्याचा प्रयत्न जोरात सुरु असल्याने महापालिकेने केलेल्या लक्ष्याच्या तुलनेत अधिक महसूल मालमत्ता कराच्या माध्यमातून वसूल झालेला दिसेल असाही विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community