Quran लिहून घेणारे महंमद पैगंबरांना लिहिता-वाचता येत नव्हते; कुराणमध्ये असंख्य चुका; पाकिस्तानी मौलवीनेच केली ईशनिंदा

या प्रकरणी आता सोशल मिडियात मौलाना मुफ्ती तारीक मसूद यांच्या अटकेची मागणी होऊ लागली आहे.

85

सध्या पाकिस्तानात  ईशनिंदाचा विषय जोरदार चर्चेत आला आहे. पण ही ईशनिंदा गैर-मुस्लिमांनी केलेली नाही, तर चक्क इस्लामचा अभ्यास करून मौलाना बनलेले मुफ्ती तारीक मसूद यांनी केली आहे. धर्मांचाच अभ्यास करणाऱ्याने आपल्याच श्रद्धास्थानाची विटंबना केल्यामुळे पाकिस्तानातील मुसलमान चांगलेच बावचळले आहेत. आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी त्यांची अवस्था झाली आहे. इतरवेळी गैर-मुसलामानाने कुराण (Quran), पैगंबर किवा अल्ला विषयी चकार शब्द काढला तरी ‘सर तन से जुदा’ करण्याची धमकी देणारे मुसलमान आता या मौलाना मुफ्ती तारीक मसूद (Mufti Tariq Masood) यांचे काय करणार, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण, नाही म्हटले तरी पाकिस्तानात सोशल मीडियावर हा विषय आता चांगलाच गाजत आहे. मौलानावर चौफेर टीका होऊ लागली आहे. मौलाना मुफ्ती तारीक मसूद यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

काय म्हणाले मौलाना मुफ्ती तारीक मसूद? 

जपानी लोकांना आपण फॉलो करतो, त्यांची भाषणे ऐकतो, युट्युबवर त्यांना बघतो, हे सगळे जण उच्च शिक्षित आहेत, कुणी शास्त्रज्ञ असेल, कुणी डॉक्टर असेल. आमचे पैगंबर यांना तर ना लिहायला यायचे, ना वाचायला यायचे. ते ‘उम्मी’ (अशिक्षित) होते. जे कुराण लिहिले आहे, त्यातील एक शब्दही पैगंबर यांनी लिहिलेला नाही, त्यांनी त्यांच्या अनुयायांकडून कुराण  (Quran)   लिहून घेतले. त्यावेळी कुराण  (Quran)   लिहिणाऱ्याकडून त्यात व्याकरणाच्या चुका झाल्या, पण आपल्या पैगंबर यांनी त्या दुरुस्त केल्या नाहीत. तुम्हाला माहितीच पडले नाही की, त्यात व्याकरणाच्या चुका आहेत. त्या चुका आजतागायत तशाच आहेत. अनुयायायींनी चुकीचे लिहिले आणि पैगंबर यांना लिहिता वाचता येत नव्हते. या चुका अल्लाने होऊ दिल्या, कारण त्यांना दाखवून द्यायचे होते की, मोहम्मद सल्लाउद्दीन आपले पैगंबर खरोखरच अशिक्षित होते. आपण सगळ्यांनी या कुराणाचे  (Quran)  असे संरक्षण केले आहे की, या कुराणमध्ये  (Quran)  चुका आहेत, तरी आपण यात दुरुस्ती करण्याची परवानगी कुणालाही दिली नाही. मोठमोठे अरबी विचारवंत आले, त्यांनी अनेकदा यावर लक्ष केंद्रित केले तरी जसे हे कुराण  (Quran)  आहे तसेच ते ग्राह्य धरण्यात आले. मग आपण मोहम्मद सल्लाउद्दीन यांना फॉलो का करत आहोत? त्यांना वाचायला येत नव्हते, लिहायला वाचायला येत नव्हते, असे मौलाना मुफ्ती तारीक मसूद (Mufti Tariq Masood)  म्हणाले.

(हेही वाचा दोषींना फाशी द्या, हिंदू धर्म भ्रष्ट करण्याचा हा कट; तिरुपती लाडू प्रकरणी Giriraj Singh यांची मागणी)

अटकेची मागणी 

याविषयाचे वृत्त डे न्यूज या वृत्त संकेतस्थळावर देण्यात आले आहे. त्यातील वृत्तानुसार मौलाना मुफ्ती तारीक मसूद  (Mufti Tariq Masood) यांनी त्यांच्या भाषणाचे स्पष्टीकरण देताना म्हटले की, त्यांचे वक्तव्य हे कुराणातील  (Quran) मजकुरावर आधारित होते. पण त्यांचे हे स्पष्टीकरण अमान्य झाले आहे.  या प्रकरणी आता सोशल मिडियात मौलाना मुफ्ती तारीक मसूद यांच्या अटकेची मागणी होऊ लागली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.