
-
प्रतिनिधी
कवी नामदेव ढसाळ यांनी आपल्या कवितांतून कामाठीपुरातील व्यथा-वेदनांना वाचा फोडली. या कामाठीपुराच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव सध्या चर्चेत आहे. या भागाचा पुनर्विकास पूर्ण झाल्यावर त्याला महान कवी नामदेव ढसाळ यांचे नाव देऊन ‘नामदेव ढसाळ नगर’ असे संबोधावे, अशी कल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी शुक्रवारी मांडली. यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पाठपुरावा करावा, असे आवाहनही त्यांनी केले. कवी नामदेव ढसाळ यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात ‘सारे काही समष्टीसाठी’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी बोलताना शेलार यांनी ढसाळ यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानाला उजाळा दिला.
(हेही वाचा – नुसरत भरुचाने घेतली PM Narendra Modi यांची भेट; ‘या’ मदतीसाठी मानले आभार)
शेलार (Adv. Ashish Shelar) म्हणाले, “नामदेव ढसाळ यांनी समष्टीचा मूलभूत विचार मांडला. त्यांचे आणि माझे जीवन काही बाबतीत समान आहे. मी आज त्यांना अभिवादन करण्यासाठी येथे आलो आहे.” यावेळी त्यांनी गिरणगावातील आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा देत ढसाळ यांच्या लेखनाशी असलेल्या नात्याचा उल्लेख केला. ते पुढे म्हणाले, “गिरणगावातील माझ्या आठवणी आणि ढसाळ यांची लेखणी यांचा एक विशेष संबंध आहे. शिक्षणाच्या प्रमाणपत्रांपेक्षा अनुभव आणि वेदनेची विद्यापीठे त्यांच्याकडे होती. त्यांचे लेखन जणू ज्वालामुखीतून बाहेर पडणारी अस्सल शक्ती होते. परंपरागत रेषा, व्याकरण आणि चौकटी मोडणारे त्यांचे साहित्य मराठी साहित्यात नवे प्रमेय मांडणारे ठरले. म्हणूनच मी ढसाळ यांना मराठी साहित्यातील ‘पायथागोरस’ म्हणतो.”
(हेही वाचा – Unseasonal Rain : उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी पावसाने घेतला ७३ लोकांचा मृत्यू)
शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी ढसाळ यांच्या व्यक्तिमत्त्वाचेही कौतुक केले. “नामदेव ढसाळ यांचे संपूर्ण आयुष्य हे समष्टीच्या लढाईला वाहिलेले होते. कोणतीही तडजोड न करता, निर्भयपणे आपले विचार मांडणारे ते खरे व्यक्तिमत्त्व होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या ‘व्यक्ती ते समष्टी, व्यक्ती ते प्रकृती’ या अंत्योदयाच्या तत्त्वाशी ढसाळ यांचा विचार एकरूप आहे,” असे त्यांनी नमूद केले. हा महोत्सव ढसाळ यांच्या साहित्यिक आणि सामाजिक वारशाला सलाम करणारा ठरला. कामाठी पुराच्या पुनर्विकासाला त्यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाने उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, यासाठी पुढील काळात ठोस पावले उचलली जाण्याची अपेक्षा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community