मुंबईत सध्या विविध मेट्रो मार्गांचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यात मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) या प्रकल्पाचेही काम सुरु आहे, पण त्याच्या कारशेडची जागा निश्चित होत नव्हती. अखेर या मार्गावरील कारशेड आणि मेट्रो ९ चे कारशेड एकाच ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएमआरडीएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुरढे गाव येथील कारशेडच्या रचनेत बदल
मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) मार्गाचे दहिसर येथील विमानतळ प्राधिकरणाच्या जमिनीवरील प्रस्तावित कारशेड रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता जिथे मेट्रो ९ (दहिसर ते मीरा-भाईंदर) कारशेड होणार आहे. त्या रायमुरढे गाव, भाईंदर येथेच मेट्रो ७ आणि ९ चेही कारशेड होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बैठकीत या तिन्ही मेट्रो मार्गासाठी एकाच ठिकाणी कारशेड उभारण्यास मंजुरी देण्यात आली. मेट्रो ७ चे काम वेगात सुरू असून येत्या काही महिन्यांतच पहिला टप्पा सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. पण मेट्रो ७ चे कारशेड निश्चित झालेले नव्हते. दहिसर येथे विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवर कारशेड प्रस्तावित होते. अखेर एमएमआरडीएने दहिसर येथील विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील कारशेड रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला. प्राधिकरणाने या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्याचवेळी मेट्रो ९ च्या मुरढे गाव येथील कारशेडच्या रचनेत बदल करत मेट्रो ९, ७ आणि ७ अ चे कारशेड एकाच ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेतला.
(हेही वाचा स्टॅण्डअप कॉमेडियन वीर दास विरोधात वाढता असंतोष! काय आहे प्रकरण?)
Join Our WhatsApp Community