Bangladesh मधील हिंदूंचे संरक्षण करा; विहिंपची मोदी सरकारकडे मागणी

बांगलादेशातील हिंदु सुरक्षित राहिल यासाठी केंद्राने पावले उचलावीत, असे रा. स्व. संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी येथे सांगितले.

145

बांगलादेशमधील (Bangladesh) हिंदूंना टार्गेट केले जात आहे. तेथील हिंदूंच्या घरादारांना आग लावून त्यांना हुसकावून लावल्या जात आहे. केंद्र सरकारने तेथील हिंदूंचे संरक्षण करावे, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंपने केली आहे. बांगलादेश (Bangladesh) एक वेगळा देश आहे. तेथील हिंदूंची घरेदारे लुटली जात आहे. तेथे हिंदु सुरक्षित राहिल यासाठी केंद्राने पावले उचलावीत, असे रा. स्व. संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी येथे सांगितले.

(हेही वाचा Bangladesh Protests: ब्रिटनमध्ये रचला शेख हसीना यांच्या विरोधातील कट; हिंसाचारामागे पाकिस्तान, चीन?)

केंद्र सरकारला आम्ही विनंती केली आहे. नक्कीच सरकार तेथील हिंदूंच्या सुरक्षेसाठी पावले उचलेल, असे भैयाजी जोशी म्हणाले. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील आलोक कुमार यांनी बांगलादेशमध्ये (Bangladesh) हिंदूंचे संरक्षण व्हावे, अशी मागणी केली आहे. बांगलादेशात हिंदूंची घरे, दुकाने, कार्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने, महिला, मुले आणि अगदी मंदिरे आणि गुरुद्वारा, त्यांची श्रद्धा केंद्रेही सुरक्षित नाहीत, असेही आलोक कुमार म्हणाले. तिथल्या अत्याचारित अल्पसंख्याकांची स्थिती वाईटाकडून वाईट होत चालली आहे, केंद्राने याची दखल घेत कारवाई करावी. बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी भारत सरकारने शक्य ती सर्व पावले उचलावीत, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे. या परिस्थितीचा फायदा घेत सीमेपलीकडून घुसखोरीचा मोठा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. याबाबत सावध राहावे लागेल, असेही विहिंपने म्हटले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.