
हिंदु समाजाचा हा मुक मोर्चा म्हणजे हिंदूंची (hindu) जागृती आणि त्यांच्यासाठी इशारा आहे, असे विधान आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar) यांनी बांगलादेशातील हिंदू (hindu) समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात ठाण्यात आयोजित केलेल्या मोर्च्यात केले. तर देश सुरक्षित ठेवायचा असेल तर अशाच प्रकारे अन्याय-अत्याचाराविरोधात आपण एकत्र यायला हवे, असे आवाहन आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांनी केले.
(हेही वाचा : AIMIM चे आमदार म्हणतात, लातूरमधील १०३ शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी Waqf Board ला परत कराव्या लागतील)
सकल हिंदु समाज व तमाम हिंदु (hindu) संघटनांच्या वतीने दि. ८ डिसेंबर रोजी बांगलादेशातील (Bangladesh) हिंदूंवरील (hindu) अत्याचाराविरोधात ठाण्यात मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये एकवटलेल्या हजारो हिंदु (hindu) बांधवांनी हाती भगवे ध्वज आणि बांग्लादेश विरोधातील फलक झळकवले. ठाणे मनपा मुख्यालय कचराळी तलावासमोरुन प्रारंभ झालेल्या मुक मोर्चाचे जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी मैदान येथे विसर्जन झाले.
दरम्यान नागरिकांनी यावेळी भारतमातेच्या जयजयकारासह एक है तो सेफ है, बटोगे तो कटोगे आदी घोषणा देत सह्यांची मोहिम देखील राबवली. त्यावेळी आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar) म्हणाले, बांग्लादेशाच्या (Bangladesh) निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये हा पहिलाच मोर्चा आहे, समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सनदशीर मार्गाने हा मुक मोर्चा काढला असून ही एकप्रकारे जागृती आणि इशारा आहे. तेव्हा, एक राहाल तरच सेफ राहाल.असे आवाहन उपस्थितांना केले.
या भव्य मुक मोर्चामध्ये इस्कॉनचे ऊरूक्रमा गौरंगा दास, आ.संजय केळकर,आमदार निरंजन डावखरे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, नारायण पवार, संदीप लेले, सुनेश जोशी, जयेंद्र कोळी, विकास पाटील , स्नेहा पाटील विक्रम भोईर आदींसह हिंदु संघटनांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी मैदानात उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना मकरंद मुळे यांनी ज्वलंत संदेश देत स्फुल्लिंग चेतवले. हिंदू समाजावर होणारे अत्याचार थांबवावे आणि इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता करावी. आदी मागण्या मूक मोर्चात फलकाद्वारे करण्यात आल्या. तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. (Bangladesh)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community