सावित्रीबाई फुले यांचा मुखवटा लावून अंगणवाडी सेविकांचे आझाद मैदानावर आंदोलन

प्रशासनाच्या दडपशाहीला कंटाळून अंगणवाडी सेविकांनी 3 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानात ठिय्या आंदोलन केले आहे. यावेळी या सेविकांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा मुखवटा धारण करुन मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत धरणे धरणार असल्याचे सांगितले आहे.

अंगणवाडी कर्मचा-यांना शासकीय कर्मचा-यांचा दर्जा द्या, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, ग्रॅच्युईटी द्या, मानधनात भरीव स्वरुपाची वाढ, सेवानिवृत्तांना एकरकमी सेवा समाप्ती लाभ, कार्यक्षम मोबाईल, राजभाषेत पोषण ट्रॅकर अॅप, अंगणवाडी केंद्राच्या भाड्यामध्ये वाढ, लाभार्थ्यांच्या पोषण आहाराच्या दरात दुपटीने वाढ आदी अनेक प्रश्नांसाठी अंगणवाडी कर्मचारी सतत संघर्ष करत आहेत. मानधनात वाढ करण्याचे आश्वासन देऊनही अद्याप अमंलबजावणी झाली नाही, अशी तक्रार करण्यात येत आहे. तसेच, अंगणवाडी कर्मचा-यांचे मोबाईल बंद व नादुरुस्त आहेत तरीदेखील त्यांना वैयक्तिक मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर भरण्याची सक्ती व जबरदस्ती केली जात आहे. या दडपशाहीमुळे अंगणवाडी कर्मचारी संतप्त झाले आहेत. अंगणवाडी कर्मचा-यांच्या या मागण्यांचा आग्रह धरण्यासाठी अंगणवाडी कर्मचा-यांनी आंदोलन केले आहे.

( हेही वाचा: समृद्धी महामार्गावर काम करणा-या मजुरांचे आंदोलन; काय आहे कारण? )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here