कार्टर रोड येथे असणाऱ्या प्रसिद्ध जॉगर्स पार्क येथे “पे अॅण्ड पार्क” ला आता विरोध होत असून स्थानिक रहिवाशांचा हा विरोध आता रेकॉर्डवरच आणला आहे. याकरता मंगळवारी स्थानिक आमदार ऍड. आशिष शेलार यांच्यातर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. (Joggers Park Mumbai)
वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या कार्ट रोड परिसरात समुद्र किनारी प्रसिद्ध “जॉगर्स पार्क” असून या परिसराचे हे खास आकर्षण ठरावे असे हे उद्यान आहे. या गार्डन समोर पार्किंगची मोकळी जागा असून आतापर्यंत मोफत पार्किंग उपलब्ध होते. मात्र यापुढे त्या जागेवर शुल्क आकारुन पार्किंगची सुविधा देण्याबाबत पालिका विचार करीत आहे. त्याला आता विरोध होऊ लागला आहे. (Joggers Park Mumbai)
(हेही वाचा – Skill Development : पुण्यात कौशल्यविकास केंद्र, सामंजस्य करार)
वांद्रे, खार, सांताक्रूझ या परिसरातील बहूसंख्य नागरिक या गार्डनमध्ये सकाळी व संध्याकाळी चालण्यासाठी येतात. फिरण्यास येणाऱ्या लोकांची ही संख्या मोठी असून त्यांना पार्किंगचा भुर्दंड पालिकेने लादू नये अशी भूमिका स्थानिक आमदार आणि मुंबई भाजपा अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांनी घेतली आहे. याबाबत पालिका आयुक्तांना लवकरच निवेदन देण्यात येणार असून या निवेदनात स्थानिकांचा असलेला विरोध प्रतिबिंबित व्हावा म्हणून वांद्रे पश्चिम विधानसभा भाजपा पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून मंगळवारी सकाळी ६.३० वाजल्यापासून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. भाजपा विधानसभा अध्यक्ष किशोर पुनवत, स्थानिक माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे आणि पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते. या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे २५० हून अधिकांनी स्वाक्षरी करुन आपला विरोध अधोरेखित केला, अशी माहिती स्थानिक माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी दिली. (Joggers Park Mumbai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community