कर्नाटक राज्यात महाविद्यालयात हिजाब घालून येण्यास मनाई केल्याने काही मुस्लिम विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मुस्लिम विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी महाविद्यालयातील हिंदू विद्यार्थ्यांनी भगवा स्कार्फ परिधान करुन आंदोलन केले. त्यामुळे भगवा विरुद्ध हिजाब असा वाद चिघळत असल्याने, राज्य सरकारने तीन दिवस शिक्षणसंस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक राज्याने केलेल्या हिजाब बंदीवरुन कर्नाटकमध्ये विविध ठिकाणी काही गटांमध्ये वादावादी झाली.
म्हणून घेतला निर्णय
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. शिमोगातील एका महाविद्यालयात एक विद्यार्थी राष्ट्रध्वजाच्या जागेवर भगवा ध्वज फडकवत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. इथे दगड फेकीनंतर जमावबंदी लागू केली आहे, तर उडुपि येथे हिजाब घातलेल्या मुलींनी महाविद्यालात प्रवेश केला. त्याचवेळी भगव्या रंगाचा स्कार्फ गुंडाळलेली काही मुले आणि मुली तेथे दाखल झाले. दोन्ही गटांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. हा वाद वाढत असल्याने राज्य सरकारने तीन दिवस सर्व शिक्षण संस्था बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
( हेही वाचा: पुणे पिंपरी चिंचवड भागात वीज नाही, काय आहे कारण?)
काय आहे वाद?
कर्नाटक राज्यातील उड्डपीमधील काही विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्यामुळे वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याविरोधात त्या मुलींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. हिजाब घालू न देणे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community