बांगलादेशात (Protests in Bangladesh) शेख हसीना यांचे सरकार पायउतार झाल्यानंतर हिंसाचार उसळला होता. यामध्ये तेथे अल्पसंख्य असलेल्या हिंदूंवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतरही हिंदूंविरुद्ध (Hindu) हिंसाचार चालूच आहे. हिंदूंकडे खंडणीमध्ये सोने, पैसे, इतकेच नव्हे, तर मुलींनाही मागितले जात आहे. यामुळे पीडित हिंदू भारताकडे व्हिसाची मागणी करत आहेत, ते व्हिसा नसतांनाही सीमा ओलांडण्याची तयारी करत आहेत. या संदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Aaditya Thackeray: भाजपा अन् ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने! रामा हॉटेलबाहेर तुफान राडा)
एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलतांना एका हिंदूने सांगितले की, १५ ऑगस्ट या दिवशी १० ते १२ दुचाकीस्वार चाकू, हातोडा आणि विळा घेऊन त्याच्या घरी पोचले आणि जेव्हा त्यांना समजले की, तो घरी नाही, तेव्हा ते निघून गेले आणि दूरभाष करून धमक्या देऊ लागले. त्यामुळे या व्यक्तीला नातेवाईकाच्या ठिकाणी लपून रहावे लागले.
जसोर येथे एका आश्रमात मत्स्यपालन व्यवसायाशी संबंधित २ हिंदूंनी सांगितले की, त्यांच्याकडून २ – ३ लाख रुपयांची मागणी केली जात आहे, अन्यथा ‘तुझ्या मुलाचे अपहरण करू’, अशी ते धमकी देत आहेत. ‘बांगलादेशात आम्हाला भविष्य नाही आणि आपली सर्व भूमी आणि मालमत्ता सोडून भारतात स्थायिक व्हायचे आहे’, असे त्यांनी सांगितले मत्स्यपालन आस्थापनात काम करणार्या एका हिंदूने सांगितले की, आमच्या मालकाला धमक्या दिल्या जात आहेत. ‘मालकाकडून पैसे काढून घ्या, अन्यथा त्यांच्या गायी घेऊन जा’, असे आम्हाला सांगण्यात येत आहे. मालकाला धमकी देणारे लोक या आस्थापनात काम करणार्या हिंदूंच्या ओळखीचे आहेत. ते बांगलादेश नॅशनल पार्टीशी (बी.एन्.पी.शी) संबंधित आहेत. ते सोने, पैसे आणि मुली यांची मागणी करत आहेत. अनेक मुलींवर बलात्कार झालेले आहेत; पण त्यांची व्यथा त्या सांगू शकत नाहीत.
आम्ही बी.एन्.पी.च्या लोकांना पैसेही दिले आहेत. नव्या सरकारवर आमचा अजिबात विश्वास नाही. आता बांगलादेशात हिंदूंना नोकर्या मिळू शकत नाहीत. सरकारी लोकच आम्हाला त्रास देत आहेत. सैन्य आणि पोलीस यांचा पत्ताच नाही. एका प्राथमिक शिक्षकावरही आक्रमण झाले आहे. त्यांना पळून जावे लागले. गावातील मंदिरांचे रक्षण करावे लागेल. पोलीस अधिकारीही पीडित हिंदूंना भेटायला सिद्ध नाहीत, असेही एका हिंदूंने सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community