म्हाडा व तत्सम प्राधिकरणांच्या ज्या सार्वजनिक शौचालयांमध्ये पुरेशी विद्युत प्रकाश व्यवस्था नसेल तिथे आठवडाभरात विद्युत प्रकाश व्यवस्था पुरवावी, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी सार्वजनिक शौचालयांच्या पाहणीदरम्यान दिले. स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) प्रत्येक शनिवारी सर्व विभागात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शनिवार १७ फेब्रुवारी २०२४ सर्व २५ प्रशासकीय विभागात (वॉर्ड) लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यास सर्वत्र स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी आज सकाळी ७.३० वाजेपासून केलेल्या दौऱ्यात या सर्व कार्यवाहीची पाहणी करतानाच स्वतः सखोल स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभागही घेतला. (BMC)
यावेळी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सह आयुक्त (परिमंडळ ३) रणजित ढाकणे, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (अतिरिक्त कार्यभार) संजोग कबरे यांच्यासह एच पूर्वच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, एच पश्चिमचे सहायक आयुक्त विनायक विसपुते, के पश्चिमचे सहायक आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) किरण दिघावकर आणि इतर संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. मोहिमेसाठी आलेल्या स्थानिक रहिवाशांशी तसेच शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व चहल यांनी अधोरेखित केले. स्वच्छता कशा प्रकारे करणे अपेक्षित आहे, याचे प्रात्यक्षिक देखील त्यांनी नागरिकांना करुन दाखवले. स्थानिक लोकप्रतिनिधी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. (BMC)
(हेही वाचा – JP Nadda : मोदींच्या हमीवर जनतेचा विश्वास; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला दिल्लीत सुरुवात)
वांद्रे-कुर्ला संकुल येथे स्वच्छता मोहिमेप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महानगरपालिका (BMC) आयुक्त डॉ. चहल यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून स्वच्छतेचा जागर करावा. शालेय परिसरात स्वच्छता उपक्रम राबवावेत. विद्यार्थी दशेतच स्वच्छतेच्या सवयी अंगीकाराव्यात, असेही त्यांन सांगितले. एच पश्चिम विभागात विष्णूबुवा कदम उद्यान येथील ९ वा रस्ता येथे पदपथ व रस्त्यांच्या कडेला पाणी फवारणी करत असताना रस्त्याच्या दुतर्फा कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे/दुचाकींमुळे कचरा काढण्याला त्याचप्रमाणे स्वच्छतेला अडसर निर्माण होत असल्याचे त्यांनी वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. हसनाबाद महानगरपालिका शाळा परिसरातील नागरिकांनी धोकादायक तारांविषयी तक्रार करताच त्या तातडीने हटविण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधितांना दिले. (BMC)
दोन्ही द्रुतगती महामार्गावरील खड्डेमुक्तीचा खर्च होणार कमी
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर दोन वर्षांपूर्वी सततच्या पावसामुळे खड्डे झाले होते. हे महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे ते सोपवावेत, अशी विनंती राज्य शासनाला करण्यात आली. शासनाने ती विनंती मान्य केली. त्यानंतर महानगरपालिकेने गत वर्षी एप्रिल ते मे महिन्यामध्ये सुमारे १५० कोटी रुपये खर्च करुन दोन्ही रस्ते अद्ययावत (अपग्रेड) करुन सुधारणा केल्या. त्यातून रस्ते सुस्थितीत राहून वाहतूक सुरळीत झाली. महानगरपालिकेची (BMC) रस्ते बांधणी, दुरुस्ती व देखभाल उत्तम दर्जाची असते, याचा प्रत्यय त्यातून आला. या दोन्ही मार्गांवर या वर्षी देखील आवश्यक असेल त्या ठिकाणी दुरुस्ती केली जाईल. मात्र त्याचे प्रमाण फारसे नसेल, परिणामी यंदा १५० कोटी रूपये खर्च करण्याची गरज भासणार नाही, असे देखील आयुक्त महोदयांनी विश्वासाने नमूद केले. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community