कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करणार; DCM Ajit Pawar यांची माहिती

126
मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक १० दिवसांत सुरळीत करा, अन्यथा... DCM Ajit Pawar यांचा इशारा

राष्ट्रीय क्रीडा संहितेचे राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणीने तंतोतंत पालन करावे आणि त्यानुसार राज्यस्तरीय निवडणूक पार पाडावी. तसेच कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्या. महाराष्ट्रात कबड्डी खेळ रूजवावा-वाढवावा यासाठी प्रयत्न करावे. कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (DCM Ajit Pawar)

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन सल्लागार समिती व कार्यकारिणीची बैठक मंगळवारी (१८ जून) दादर शिवाजी पार्क येथील कबड्डी महर्षी शंकरराव साळवी सभागृहात अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री पवार (DCM Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. असोसिएशनचे उपाध्यक्ष आमदार भाई जगताप, माजी आमदार अमरसिंह पंडित, दिनकर पाटील, उपाध्यक्ष शकुंतला खटावकर, सहकार्यवाह बाबुराव चांदेरे, खजिनदार मंगल पांडे, सहकार्यवाह रविंद्र देसाई, असोसिएशनचे आजीव सदस्य अविनाश सोलवट यांच्यासह कार्यकारिणी सदस्य आणि असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. (DCM Ajit Pawar)

(हेही वाचा – बाळासाहेबांच्या स्मारकाचे लोकार्पण लवकरच; Uddhav Thackeray यांची माहिती)

उपमुख्यमंत्री पवार (DCM Ajit Pawar) म्हणाले की, कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसांची रक्कम वाढविण्यात आली आहेत. राज्यात खेळ संस्कृतीला महत्व प्राप्त व्हावे यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. ग्रामीण भागात कबड्डी जास्त रूजली आणि वाढली असल्याने आमदार निधी, जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला जातो. कबड्डी खेळाला पूर्वीचे दिवस आणण्यासाठी असोसिएशनमार्फत प्रयत्न करायला हवेत. राष्ट्रीय संहितेनुसार कार्यकारिणी निवडणूक घेण्यात यावी. तसेच स्पोर्ट्स कोडचे पालन करण्यात यावे. २१ जून रोजी नव्याने होणाऱ्या कार्यकारिणीसाठी निवडणूक होणार असून, १९ जून ही जिल्हानिहाय मतदारांची नावे स्विकारण्याची अंतिम तारीख असल्याचेही त्यांनी सांगितले. (DCM Ajit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.