कुर्ला वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक शाहीर प्रवीण फणसे (API Praveen Phanse) यांचा नूतन पोवाडा शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘राजाची रायरी मावळा एक एक पायरी’ असे या पोवाड्याचे बोल असून साहाय्यक पोलीस निरीक्षक शाहीर प्रवीण फणसे यांनीच त्याचे लेखन आणि गायन केले आहे. या पोवाड्याला त्यांची पत्नी अश्विनी आणि मुले कु. शर्वरी (वय १२ वर्षे) व चि. वीर (वय ८ वर्षे) यांनी साथ दिली आहे.
(हेही वाचा – Jodhpur येथे मुसलमानांकडून हिंसाचार; पेट्रोल बाँबचा वापर)
शिवराज्याभिषेक दिनी पोवाडा गाण्याची संधी
वाहतूक पोलीस दलात कार्यरत असूनही लहानपणीपासून असलेल्या गायनाच्या आवडीमुळे प्रवीण फणसे यांना १० वर्षांपूर्वी रायगडावर शिवराज्याभिषेक दिनी (Shivrajyabhishek Ceremony) पोवाडा गाण्याची संधी मिळाली. शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती दुर्गराज रायगड प्रतिवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा करतात. त्यांच्या कार्यक्रमात पोवाडा सादर करण्याची संधी मिळाल्यानंतर प्रवीण फणसे यांनी विविध व्यासपिठावर पोवाडे सादर केले. त्यांनी शाहिरीचा अधिक बारकाईने अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापिठातून लोककला या विषयात डिप्लोमाही केला आहे.
रायगडावर गेल्यानंतर तेथील राजसिंहासन पहातांना शाहिर फणसे यांना जाणीव झाली की, याच पायऱ्या चढतांना राजांना एकेका मावळ्याची आठवण होत असेल. त्या जाणीवेतून ‘राजाची रायरी मावळा एक एक पायरी’ हे गीत लिहिले गेले आहे, असे साहाय्यक पोलीस निरीक्षक शाहीर प्रवीण फणसे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलतांना सांगितले.
शाहिरीसाठी आवश्यक असलेली वाद्येही त्यांनी विविध मान्यवरांकडून शिकून घेतलेली आहेत. Shahir Pravin Phanse या नावाने त्यांचे युट्यूब चॅनल आहे. त्यावर त्यांनी विविध प्रसंगी सादर केलेले पोवाडे पहायला मिळू शकतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community