- विशेष प्रतिनिधी, मुंबई
केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार, गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, मागील ५ वर्षांतील प्रलंबित वारसाहक्क तथा अनुकंपा (पी. टी.) प्रकरणे निकाली काढण्यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या (Solid Waste Management) वतीने ०३ ते ०८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीदरम्यान महानगरपालिका मुख्यालयात दररोज सकाळी ११ वाजल्या पासून शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मागील ०५ सप्टेंबर २०२४ रोजी सादर केलेल्या अहवालानुसारच संबंधित विभागाकडून अवगत करण्यात आलेले कर्मचारी तसेच अर्जदारांनाच या शिबिरात उपस्थित राहता येणार असून ज्यांचे अर्ज नसतील त्यांचा विचार या शिबिरांत केला जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
(हेही वाचा – BMC : महापालिकेत सहायक आयुक्तांच्या खांद्यावर अतिरिक्त कार्यभाराचा बोजा)
मुंबई महानगरपालिकेतील कोणतीही वारसाहक्क/अनुकंपा तत्वावरील (पी. टी. केस) प्रकरणे प्रलंबित राहणार नाही, या अनुषंगाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (अतिरिक्त कार्यभार) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली प्रलंबित वारसाहक्क, अनुकंपा पी. टी. प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याच्या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. (Solid Waste Management)
(हेही वाचा – इंदापूरचे Harshvardhan Patil यांची स्थिती ‘न घर का, न घाट का’)
येत्या ०३ ते ०८ ऑक्टोबर २०२४ दरम्यान शिबिराचा पहिला टप्पा म्हणजेच परिमंडळ-१ मधील विविध प्रशासकीय विभाग कार्यालयांमधील प्रलंबित प्रकरणांबाबत शिबिर घेण्यात येत आहे. उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) कार्यालय, तिसरा मजला, विस्तारित इमारत, महानगरपालिका मुख्यालय, मुंबई येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या अंतर्गत ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘ए विभाग’, ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘डी विभाग’, ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘बी आणि सी विभाग’, ०८ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘ई विभाग’ कार्यालयांतील प्रलंबित प्रकरणांबाबत शिबिर घेण्यात येईल. ०५ सप्टेंबर २०२४ रोजी सादर केलेल्या अहवालानुसार संबंधित विभागाकडून अवगत करण्यात आलेले कर्मचारी तसेच अर्जदारांनीच या वेळापत्रकानुसार सकाळी ११ वाजता महानगरपालिका मुख्यालयात उपस्थित राहावे, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे. (Solid Waste Management)
(हेही वाचा – Tirupati Laddu Prasad Adulteration प्रकरणाचा तपास तात्पुरता थांबवला)
शिबिराचे वेळापत्रक
शिबिराची तारीख विभाग आणि वेळ
- दिनांक ०३. १०. २०२४ (ए) सकाळी ११ वा
- दिनांक ०४. १०. २०२४ (डी) सकाळी ११ वा
- दिनांक ०७. १०. २०२४ (बी )आणि( सी) सकाळी ११ वा
- दिनांक ०८. १०. २०२४ (ई) सकाळी ११ वा
हेही पहा –
Join Our WhatsApp Community