Mahaparinirvan Din निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर

137
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या ६८ व्या परिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) ६ डिसेंबर २०२४ रोजी राज्य शासनाने सुट्टी (Mahaparinirvan Din Holiday) जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई शहर (Mumbai city) आणि उपनगर (Mumbai suburbs) जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना हा आदेश लागू आहे. (Mahaparinirvan Din)

येत्या ६ डिसेंबर २०२४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या लाखो अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल एक बैठक घेतली. यावेळी त्यांनी अनुयायांना शिस्तबद्ध पद्धतीने डॉ. बाबासाहेबांच्या चैत्यभूमीतील (Chaityabhoomi) स्मारकाचे दर्शन घेता यावे यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे आदेश दिले आहे. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहिर करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी ४ ते ७ डिसेंबरपर्यंत विशेष बस प्रवासाची योजना करण्यात आली आहे. त्याशिवाय दादर रेल्वे स्थानकापासून (Dadar Railway Station) ते चैत्यभूमीपर्यंत १५ ते २० मिनिटांच्या अंतरावर बस सेवा देण्यात येणार आहे.

(हेही वाचा – राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाला सुरुंग लावण्यात Ajit Pawar यांना यश)

१२ विशेष लोकल धावणार
तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvana Day Special Local train) राज्यभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वेची खास सुविधा करण्यात आली आहे. गुरुवारी ५ डिसेंबर मध्यरात्रीपासून परेल – कल्याण आणि कुर्ला – पनवेल स्थानकांदरम्यान १२ विशेष लोकल ट्रेन चालवल्या जाणाऱ्या आहेत. या सर्व ट्रेन सर्व स्थानकांत थांबतील.

हेही पाहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.