‘लोकल सर्कल’ या संस्थेने देशातील ३४१ जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण केले आहे. (Public Toilets) त्यामध्ये ३९ हजारपेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला. या सर्वेक्षणात आपल्या शहरात किंवा जिल्ह्यामध्ये सार्वजनिक शौचालयाची उपलब्धता वाढली आहे, असे सुमारे ४२ टक्के लोकांनी सांगितले. (Public Toilets)
(हेही वाचा – Gadchiroli : गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागातील महिलांना सामाजिक संस्थांचे साहाय्य)
देशामध्ये स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात होऊन ९ वर्षे झाली. या काळात देशातील सार्वजनिक शौचालये स्वच्छ नाहीत, असे मत बहुसंख्य भारतियांनी व्यक्त केले आहे. सार्वजनिक शौचालयांचा वापर करण्याऐवजी एखाद्या व्यावसायिक आस्थापनामध्ये जाऊन तेथील शौचालयाचा वापर करण्यास प्राधान्य देऊ असे सर्वेक्षणात भाग घेतलेल्या बहुसंख्य लोकांनी सांगितले. मुंबई, दिल्ली किंवा बंगळूरु यासारख्या शहरांमध्ये सुलभ शौचालयासारख्या प्रतिष्ठित संस्थेने व्यवस्थापन केलेले नसेल, तर सार्वजनिक शौचालयांचा वापर करणे एखाद्य दु:स्वप्नासारखे असते असेही या सर्वेक्षणामध्ये आढळले आहे. (Public Toilets)
स्वच्छतेविषयी लोक नाराज
या सर्वेक्षणात शौचालयांच्या स्वच्छतेविषयी पण अभ्यास करण्यात आला. या वेळी अनेकांनी आपापली मते आणि निरीक्षण व्यक्त केले. यामध्ये शौचालयांची स्थिती चांगली नसल्याचे मत ५२ टक्के लोकांनी व्यक्त केले. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या ३७ टक्के लोकांच्या मते सार्वजनिक शौचालय साधारण किंवा कामापुरते ठीक आहे, २५ टक्के लोकांनी ते सरासरीपेक्षा वाईट, क्वचितच काम करत असल्याचे सांगितले, १६ टक्के लोकांना ते भयानक वाटले आणि १२ टक्के लोकांनी सांगितले की, ते इतके वाईट होते की ते वापर न करताच बाहेर आले. (Public Toilets)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community