- ऋजुता लुकतुके
लवकरच तुम्ही एकाच प्री-पेड कार्डावर (pre-paid cards) देशभरात कुठेही प्रवास करू शकणार आहात. प्रत्येक प्रवासाच्या वेळी तुमचं प्रवास भाडं या कार्डातून वळतं केलं जाईल. तुम्ही कुठल्याही राज्यांत किंवा शहरात असाल आणि कुठल्याही मार्गाने प्रवास करत असाल तरी हे कार्ड तुम्ही वापरू शकाल. तसं सेवांचं एकत्रीकरण या कार्डात करण्यात येईल. रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) शनिवारी बँका किंवा वित्त संस्थांना असं प्री-पेड कार्ड (pre-paid cards) काढण्याची सैद्धांतिक परवानगी दिली आहे. (Public Transport Card)
या निर्णयामुळे लोकांचा प्रवास आणि त्याचं नियोजन अगदी सोपं होणार आहे. बस, मेट्रो, लोकल ट्रेन, लांब पल्ल्याची ट्रेन यांच्याबरोबरच पार्किंगचं शुल्क देणंही या कार्डामुळे शक्य होईल. ‘देशभरातील सार्वजनिक वाहतूक यंत्रणांमध्ये मेट्रो, लोकल ट्रेन, बस अशा वेगवेगळ्या माध्यमांचा समावेश होते. अशावेळी ग्राहकांना प्रवासाचं योग्य नियोजन करता यावं, हे नियोजन वेगवान, योग्य दरात आणि कटकटीशिवाय व्हावं यासाठी पीपीआय कार्डाची सोय करण्याचा मानस आहे,’ असं रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank) ताज्य पत्रकात म्हटलं आहे. (Public Transport Card)
(हेही वाचा – Chief Minister Eknath Shinde: आरक्षण कसे टिकेल यावर सकारात्मक चर्चा व्हायला हवी, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला)
रिझर्व्ह बँकेच्या पत्रकातील इतर गोष्टी,
-
बँका व वित्तीय संस्थांना हे कार्ड काढण्याची परवानगी असेल.
-
स्थानकं किंवा प्रवासी माध्यमांमध्ये एक यंत्र असेल आणि त्यातून प्रवासाची रक्कम कापून घेतली जाईल. प्रवास भाडं, टोल तसंच पार्किंग साठीही हे कार्डं वापरता येईल.
-
हे कार्ड फक्त आणि फक्त प्रवासासाठीच वापरता येईल.
-
या कार्डावर केवायसी लागणार नाही.
-
या पीपीआय कार्डात रक्कम केव्हाही हस्तांतरिक करता येईल.
-
एकावेळी एका कार्डात ३,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम असता कामा नये.
-
या पीपीआय कार्डांना एक पुनर्निधारित मुदतही असेल. त्यानंतर हे कार्ड संपेल.
-
पैसे काढून घेणं, रिफंड किंवा पैसे हस्तांतरित करण्याची सोय या कार्डांत नसेल. (Public Transport Card)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community