अयोध्येतील रामजन्मभूमीच्या सध्याच्या मंदिरात भाविकांची दर्शन पूजा २० जानेवारीपासून बंद होणार आहे. मात्र राम मंदिरातील पुजारी पूजेचा कार्यक्रम सुरु ठेवणार आहेत. विविध कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू आहे. (Ayodhya Ram mandir)
राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम असल्याने २२ जानेवारीला सध्याच्या मंदिरातून प्रभू श्रीरामांची बालमूर्ती स्थापित करण्यासाठी २० जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत तात्पुरत्या मंदिरात भक्ताचे दर्शन आणि पूजा बंद राहणार आहे असे रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांनी सांगितले. ट्रस्टच्या निमंत्रण पत्रिकेसोबतच २२ जानेवारीला अयोध्येत प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामध्ये सर्व भाविकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकारने राम मंदिर तयारीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची घोषणा केली आहे. तसेच प्रतिष्ठापनेनंतर येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र आणि इतर सामाजिक संस्था सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत. (Ayodhya Ram mandir )
(हेही वाचा : Ram Mandir: अयोध्येत श्रीरामाचे धनुष्यबाण सोने-हिरेजडीत, जगातील विविध देशांमधून १०० विशेष रामभक्तांना आमंत्रण)
विमानतळ व रेल्वेस्थानकाचे उद्घाटन
३० डिसेंबर रोजी विमानतळाचेही उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर मोदी अयोध्येत रोड शो घेणार असून नंतर एक सभाही घेणार आहेत.राम मंदिराचे उदघाटन पुढील वर्षी २२ जानेवारीला होणार आहे. त्यासाठी अयोध्येचाही कायापालट करण्यात आला आहे. अयोध्येत नवीन विमानतळ उभारण्यात आले असून रेल्वेस्थानकाचाही पुनर्विकास करण्यात आला आहे. मोदी हे ३० डिसेंबरला अयोध्येत येणार असून यावेळी ते विमानतळ आणि रेल्वेस्थानक यांचे उद्घाटन करतील. विमानतळ आणि रेल्वेस्थानक यांच्यातील अंतर १५ किलोमीटरचे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community