टोमॅटो आणि कांद्यानंतर आता डाळींच्या किमतीतही मोठी वाढ (Pulses Price Hike) दिसून येत आहे. तूर डाळीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. डाळींचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार अनेक प्रयत्न करत असूनही त्यात विशेष यश मिळताना दिसत नाही. वर्षभरात तूर डाळ 27 टक्क्यांनी महागली आहे, त्यामुळे उडीद, मसूर या डाळीचे भावही वाढले आहेत. अशातच यंदा पाऊस कमी झाल्याने येत्या काही दिवसांत डाळींच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या किंमत निरीक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, 29 ऑगस्ट 2022 रोजी तूर डाळीची सरासरी किंमत 110.66 रुपये प्रति किलो इतकी होती. तुरीच्या डाळीचे भाव एका वर्षात 140.34 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले. एका वर्षात तूर डाळीच्या दरात 27 टक्के वाढ झाली. (Pulses Price Hike)
(हेही वाचा – Nawab Malik : नवाबने अडवला ‘राखी’चा मार्ग)
अन्न ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एका वर्षापूर्वी 29 ऑगस्ट 2022 रोजी मूग डाळीची सरासरी किंमत 102.35 रुपये प्रति किलो होती. ती आता 111.19 रुपये झाली आहे. एका वर्षात मूग डाळ 8.15 टक्क्यांनी महागली आहे. एका वर्षापूर्वी उडदाची डाळ प्रतिकिलो 108.25 रुपयांना मिळत होती, आता उडीद डाळ 115.02 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे, म्हणजेच उडीद डाळ 6.25 टक्क्यांनी महाग झाली आहे. वर्षभरापूर्वी मसूर डाळीची सरासरी किंमत 92.09 रुपये प्रतिकिलो होती, ती आता 97.16 रुपये किलो झाली आहे. आता चणा डाळीच्या दरातही मोठी वाढ पाहायला मिळत आहे. वर्षभरापूर्वी चणाडाळ 74.15 रुपये किलो दराने उपलब्ध होती, जी आता 77.9 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे.
अलीकडच्या काळात तूर आणि उडीद डाळीच्या वाढत्या किमती पाहता सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. सरकारने डाळ आयात करणाऱ्या आयातदारांना कस्टम क्लिअरन्स मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत डाळी बाजारात आणण्याचे निर्देश दिले आहेत. कस्टम क्लिअरन्स मिळाल्यानंतर 30 दिवसांपेक्षा जास्त काळ डाळींची साठवून ३० दिवसापेक्षा जास्त काळ करू नये, असे निर्देश आयातदारांना देण्यात आले आहेत. यासोबतच दर शुक्रवारी सर्व आयातदारांना विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवर तूर आणि उडीद डाळीच्या साठ्याची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.
ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत डाळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकारने चणा डाळ प्रति किलो 60 रुपये आणि 30 किलोच्या पॅकसाठी 55 रुपये प्रतिकिलो या अनुदानित दराने डाळीची विक्री सुरु केली आहे. सरकारने ‘भारत डाळ’ या नावाने चणाडाळ विक्रीसाठी बाजारात आणली आहे. नाफेड, एनसीसीएफ, केंद्रीय भांडार आणि सफलच्या किरकोळ विक्री केंद्रातून भारत डाळीचे वितरण केले जात आहे. (Pulses Price Hike)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community