-
ऋजुता लुकतुके
दसऱ्यानंतर आता दिवाळीचे वेध लोकांना लागले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर सरकारचा आटापिटा सुरू आहे तो डाळींच्या किमती आटोक्यात ठेवण्यासाठी. (Pulses Price Hike)
या अख्ख्या वर्षी डाळींच्या किमती सातत्याने वाढतायत. देशाच्या महागाई दरातही डाळींच्या दरवाढीनेच मोठी भूमिका बजावली आहे. अशावेळी दिवाळी ते नववर्षाच्या काळात तरी डाळींच्या किमती स्थिर राहाव्यात यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना सुरू केली आहे. (Pulses Price Hike)
सप्टेंबर महिन्यात घाऊक बाजारातील डाळींचा महागाई दर १७.७ टक्के म्हणजे मागच्या ४८ महिन्यातील सर्वोत्तम होता. पुढच्या सहा महिन्यात घरगुती बाजारपेठांमध्ये डाळींचा तुटवडा भासू नये यासाठी सरकारने काही निर्णय घेतले आहेत. (Pulses Price Hike)
यात सरकारी गोदामांमध्ये डाळींची अतिरिक्त साठवणूक, मध्यस्थ आणि व्यापाऱ्यांनी डाळ बेकायदा साठवून ठेऊ नये यासाठी डाळींच्या साठवणुकीवर मर्यादा आणणे आणि गरज लागेल तशी परदेशातून त्वरित डाळ आयात करणे असा तीन कलमी कार्यक्रम केंद्राने आखला आहे. (Pulses Price Hike)
‘पुढील सहा महिने तरी डाळींच्या किमती स्थिर राहतील, असा सरकारचा अंदाज आहे. बाजारात ताजा कृषिमाल येणं अपेक्षित आहे. शिवाय आपण जिथून गरजेला डाळी आयात करतो, तिथे डाळीचं उत्पादन चांगलं झालं आहे आणि सरकारी गोदामांमध्येही अतिरिक्त डाळ साठवण्यात आली आहे. गरज पडेल तेव्हा हा साठा खुला करण्यात येईल,’ एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी नाव न जाहीर करण्याच्या बोलीवर पीटीआयला ही माहिती दिली आहे. (Pulses Price Hike)
तशा सगळ्याच प्रकारच्या डाळींच्या किमती वर्षभरात वाढल्या आहेत. पण, त्यातही तूर आणि उडिद डाळींमधील दरवाढ जास्त आहे. एकट्या तूरडाळीचा महागाई दर सप्टेंबर महिन्यात ३७ टक्के इतका होता. हे लक्षात घेऊन खाजगी व्यापारी आणि मध्यस्थ यांच्या साठवणूक क्षमतेवर तात्काळ मर्यादा घालण्यात आली आहे. (Pulses Price Hike)
सरकारने आतापर्यंत १.६ लाख मेट्रिक टन इतकी तूर डाळ सरकारी गोदामांतून खुली केली आहे आणि त्याचवेळी सरकारी गोदामांत कुठल्याही क्षणी ६ लाख मेट्रिक टन तूरडाळ साठवलेली असेल याची खात्री करून घेण्यास संबंधित विभागाला सांगण्यात आलं आहे. ब्रम्हदेश तसंच पूर्व आफ्रिकन देशांमधून तूरडाळ तसंच उडिद डाळ आयात करण्याची तयारीही सरकारने ठेवली आहे. (Pulses Price Hike)
(हेही वाचा – Rashtriya feriwala dhoran : मुंबईत फेरीवाल्यांच्या मतदार यादीला मंजुरी, लवकरच घेतली जाणार निवडणूक)
नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत तयार झालेली डाळ बाजारात यायला सुरुवात होईल. त्यामुळेही किमती आटोक्याच राहतील असा सरकारचा होरा आहे. किमती आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्राने जानेवारी २०२३ पासूनच तूरडाळ आणि उडिद डाळींच्या आयातीवरील शुल्क माफ केलं आहे. तरीही सप्टेंबर पर्यंत तूरडाळीची किंमत १५२ रुपये प्रती किलोवर गेली होती. तर उडिद डाळीची किंमतही ११९ रुपये प्रती किलो इतकी आहे. (Pulses Price Hike)
काही ठिकाणी सरकारने भारतडाळ या नावाने तूरडाळ ६० रुपये प्रतीकिलो दराने उपलब्ध करून दिली आहे. हा खास सवलतीचा दर होता. पण, सरकारने प्रयत्न करूनही डाळींचे दर सप्टेंबरपर्यंत चढेच होते. आता ते निदान स्थिर राखण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. (Pulses Price Hike)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community