पुण्यात भीषण अपघात! तब्बल 47 गाड्या एकमेकांवर आदळल्या, 60 जण गंभीर जखमी

पुणे जिल्ह्यातील धनकवडी येथे रविवारी रात्री भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. धनकवडी येथील नवले ब्रीजजवळ एका भरधाव कंटेनरने तब्बल 47 पेक्षा जास्त गाड्या उडवल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्याला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, या अपघातात 50 ते 60 जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळत असून, मृतांबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः श्रद्धा हत्याकांड प्रकरणः दिल्ली पोलिसांना आले मोठे यश, जंगलात सापडली कवटी आणि हाडांचे तुकडे)

47 गाड्यांचा अपघात

पुण्यातील दरी पुलावर एका भरधाव कंटेनरने गाड्यांना जोरात धडक दिल्यामुळे एकामागोमाग एक गाड्या एकमेकांवर आदळल्याचे सांगण्यात येत आहे. या विचित्र अपघातात 15 ते 16 गाड्यांचा गंभीर अपघात झाला असल्याची माहिती सिंहगड पोलिसांकडून देण्यात येत आहे. तसेच 47 गाड्यांना या अपघाताचा फटका बसल्याचे सांगण्यात येत असून, 50 ते 60 जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः 21 नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेवरील ‘या’ लोकल होणार 15 डब्यांच्या, बघा संपूर्ण यादी)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here