पुणे-नगर मार्गावर वडगाव शेरी (Pune Accident) चौकालगत सोमवारी पहाटेच्या सुमारास एक टँकर पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वायू गळती झाली आहे. त्यामुळे पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकूण ८ अग्निशमन वाहने कार्यरत असून आग आणि स्फोट होण्याचा धोका आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे टॅंकरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या कर्माचाऱ्यांकडून टँकरवर स्प्रे मारण्याचे काम सुरू आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांकडून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. टँकर रस्त्याच्या मध्यभागी उलटला. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅसगळती सुरू झाली. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून टँकरवर स्प्रे मारण्याचे काम सुरू आहे.
(हेही वाचा – Nashik Rain : नाशिकमध्ये वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि गारपीट; कांदा, द्राक्ष पिकांचे नुकसान)
रिलायंस पेट्रोकेमिकल्स कंपनीची मदत येईपर्यंत धोका लक्षात घेऊन टँकरवर पाण्याचे स्प्रे मारण्यात येत होते. पोलीस विभागाकडून वाहतूक नियंत्रित केली असून रस्ता व्यवस्थित सुरू होण्यासाठी अजून दोन तास लागणार आहेत.
हेही पहा –