कोकणातील हरिहरेश्वरकडे सुटीनिमित्त पर्यटनासाठी निघालेल्या पुण्यातील पर्यटकांची (Pune Accident) बस ताम्हिणी घाटात उलटली. हा अपघात शनिवारी (३० डिसेंबर) झाला. या अपघातात २ तरुणींचा मृत्यू झाला, तर ५५ प्रवासी जखम झाले.
पुण्यातील कोथरूड परिसरातील विविध कंपन्यांचे सुमारे ५७ कर्मचारी शनिवारी पहाटे कोकणातील हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी साई गणराज या खासगी कंपनीच्या बसने निघाले होते.
(हेही वाचा – Mumbai Riots : जरांगे-पाटलांचा मुंबईत ३ कोटी जमाव जमवण्याचा इशारा; यापूर्वी कोणकोणत्या आंदोलनांमुळे हादरलेली मुंबई?)
सकाळी ७.३०च्या सुमारास बस कोंडेथर गावच्या हद्दीतील वळणार आली असता चालकाचे नियंत्रण सुटून ती उलटली. या अपघातात सुरभी मोरे (२३), कांजन मांजरे (२०) या दोघींचा जागीच मृत्यू झाला; तर उर्वरित ५५ पर्यटक प्रवासी जखमी झाले. त्यात २३ महिलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी माणगावमधील साळुंके रेस्क्यू टीमला पाचारण केले. त्यांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. अपघातप्रकरणी बसचालक भैरवनाथ कुंभार याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मोठी दुर्घटना टळली
जिथे अपघात घडला त्या ठिकाणी धोक्याचे वळण असल्याने भविष्यात दुर्घटना घडू नये, यासाठी राजेंद्र पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम व रस्ते विकास मंडळ यांच्याकडे पाठपुरावा करून वळणार लोखंडी संरक्षण कठडे उभारले होते. ही बस उलटून कठड्यांना अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community