Pune Air Pollution : पुणेकरांनो जरा जपून! शहरातील वायू प्रदूषणात होतेय झपाट्याने वाढ

131
Pune Air Pollution : पुणेकरांनो जरा जपून! शहरातील वायू प्रदूषणात होतेय झपाट्याने वाढ

मागच्या काही दिवसांपासून मुंबईत धुक्याची चादर पसरली आहे, ज्यामुळे शहराची (Pune Air Pollution) हवा खराब झाली आहे. या शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये ‘मध्यम’ श्रेणीत गेली. गेल्या सात ते आठ दिवसांपासून सलग हा प्रकार सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी-मॅनेज्ड सिस्टम (Pune Air Pollution) ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च नुसार, बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या हवेतील पीएम म्हणजेच पार्टिक्युलेट मॅटर १० ची पातळी १८२ तर दिल्लीमधील २३८ नोंदवण्यात आली आहे.

(हेही वाचा – Ola Electric : ओला कंपनीने नवरात्रीत दर दहा सेकंदांना एक स्कूटर विकली)

आयआयटी दिल्लीच्या ट्रिप-सेंटरच्या अहवालानुसार, ११ टक्क्यांहून जास्त लोकसंख्येच्या शहरांत १०० पेक्षा अधिक एक्यूआय नोंदवला गेला. मध्य भारतातील १४ शहरांपैकी पुण्यात (Pune Air Pollution) गेल्या २५ वर्षांत प्रदूषण वार्षिक १०४% वाढले. रायपूरमध्ये ५८%, रांची ९८%, इंदूर ७४%, भोपाळमध्ये ७५% वाढले. जम्मूत २८%, तर डेहराडूनमध्ये ३०% वाढले. शिलाँग ७५%, तर विशाखापट्टणचे ९८% प्रदूषण वाढले.

पुण्याची हवा मुंबई – दिल्लीपेक्षा खराब

मुंबई, दिल्लीच्या तुलनेत पुण्याची हवा जास्त खराब (Pune Air Pollution) झाल्याचे पाहायला मिळाले. हवेतील अतिसूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण (पार्टिक्युलेट मॅटर २.४) अधिक आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे श्‍वसनाचा आजार असलेल्या नागरिकांना आरोग्यासंबंधीचा धोका वाढला आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक १८२ वर तर पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक दिवसागणिक वाढत आहे. हिवाळ्यात मागील चार वर्षात मुंबईतील हवा गुणवत्ता (Pune Air Pollution) दिल्लीपेक्षा वाईट असल्याचा अनेक संस्थांचा अभ्यास आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.