Pune Airport : पुणे विमानतळावर एरोब्रिजचा पूर्ण वापर; हवाई प्रवाशांची पायपीट थांबली!

79
Pune Airport : पुणे विमानतळावर एरोब्रिजचा पूर्ण वापर; हवाई प्रवाशांची पायपीट थांबली!

पुणे विमानतळाच्या (Pune Airport) नव्या टर्मिनलमध्ये सर्व दहा एरोब्रिजचा पूर्ण वापर प्रवाशांकडून सुरू झाला आहे. त्यामुळे हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ‘पार्किंग बे’पासून टर्मिनलपर्यंत होणारी पायपीट थांबली आहे. विमानतळावर प्रवाशांना आता चालत जावे लागत नाही. त्यांची सुरक्षितताही त्यामुळे वाढली आहे.

(हेही वाचा – Moeen Ali Retired : स्टार इंग्लिश फिरकीपटू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक जाहीर केली निवृत्ती)

यापूर्वी काही दिवसांपर्यंत एरोब्रिजचे भाडे द्यावे लागते म्हणून विमान कंपन्या त्याचा कमीत कमी वापर करण्यावर भर देत होत्या. त्यामुळे रोज शेकडो प्रवाशांना ‘पार्किंग बे’पासून टर्मिनलच्या इमारतीपर्यंत चालत जावे लागत होते. यात अपघाताचा धोका होता. अखेरीस विमानतळ प्रशासनाने (Pune Airport) आग्रही भूमिका घेतल्याने सर्वच विमान कंपन्यांना एरोब्रिजचा वापर अनिवार्य झाला आहे. पुणे विमानतळावरील दहा पैकी पाच एरोब्रिज नव्या टर्मिनलला जोडण्यात आले आहेत. इतर पाच एरोब्रिज जुन्या टर्मिनलला जोडण्यात आले आहेत.

(हेही वाचा – PPF Scheme : पीपीएफ योजनेत होणार ‘हे’ ३ बदल)

पुणे विमानतळावर (Pune Airport) टर्मिनलमध्ये सुरक्षितपणे जाण्यासाठी एरोब्रिज व ‘लॅडर’ची व्यवस्था असतानाही प्रवाशांना अनेकदा ‘पार्किंग बे’पासून टर्मिनलपर्यंत चालत जावे लागत होते. विमानतळाच्या ‘एअर साइड’वर (विमानतळाच्या आतील बाजू, जेथे विमाने थांबलेली असतात) विविध वाहनांची सतत वाहतूक होत असते. यातून प्रवाशांना मार्ग काढावा लागणे म्हणजे एखाद्या अपघाताला आमंत्रण देण्यासारखे होते. मागील तीन महिन्यांत ‘ग्राउंड स्टाफ’कडून ‘एअर साईड’ला दोन अपघात झाले आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय अगदी योग्य ठरला आहे. प्रवाशांना आता बसचीही आवश्यकता राहिलेली नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.