पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवं टर्मिनल सेवा पुरवण्यासाठी सज्ज झालं आहे. CRPF जवानांच्या पूर्ततेनंतर आता याची तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात आहे. येत्या रविवारी म्हणजेच १४ जुलै रोजी हे नवे टर्मिनल सुरू होईल. (Pune Airport)
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवे टर्मिनल रविवारपासून (दि. १४) सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतकू राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Union Minister of State for Civil Aviation Muralidhar Mohol) यांनी दिली. नवे टर्मिनल सुरु झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून म्हटले आहे. (Pune Airport)
Pune Airport’s new terminal to be functional from this Sunday !
After completing the requirements of CISF personnel & other technicalities, the new terminal of Pune Intl Airport is set to be at the service of citizens, from 14th July, Sunday.
As an inaugural gesture, I will be… pic.twitter.com/rQ43AURo5j
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 8, 2024
नवे टर्मिनल सुरु करण्यासाठी सीआयएसएफच्या अतिरिक्त जवानांची आवश्यकता होती. यासाठी मोहोळ यांनी गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. त्यास तातडीने परवानगी मिळून सीआयएसएफचे जवान पुणे विमानतळावर दाखलही झाले आहेत. तसेच नव्या टर्मिनलमध्ये इनलॅंड बॅगेज सिस्टिम बसवण्याची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. याची तांत्रिक ही प्रक्रिया वेगाने सुरू असून ती तातडीने पूर्ण केली जात आहे. त्यामुळे नवे टर्मिनल कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
(हेही वाचा – Central Railway : मुसळधार पावसामुळे मेल/एक्सप्रेस गाड्या रद्द )
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पहिला बोर्डिंगपास
नव्या टर्मिनलच्या पहिल्या प्रवाशाला केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात येणार आहे. एअर इंडियाच्या प्रवाशाला १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता बोर्डिंग पास देत नवे टर्मिनल कार्यान्वित करण्यात येणार आहे. (Pune Airport)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community