हवाई प्रवाशांना (Air passengers) आपत्कालीन वैद्यकीय प्रसंगी आता तातडीने उपचार मिळणार आहे. पुणे विमानतळावरील (Pune Airport) नवीन टर्मिनलमध्ये आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात प्रवाशांवर मोफत उपचार केले जाणार असून, हा कक्ष २४ तास खुला असणार आहे. आपत्कालीन वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन गुरुवारी पुणे विमातळाचे संचालक संतोष ढोके आणि ग्रँट मेडिकल फाउंडेशनचे रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट यांच्या हस्ते झाले. हा कक्ष नवीन टर्मिनल इमारतीतील चेक-इन भागात आहे. एखाद्या प्रवाशांवर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यास या कक्षात ही वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कक्षात प्रवाशांवर मोफत उपचार केले जाणार असून, तो २४ तास खुला असणार आहे. (Pune Airport)
(हेही वाचा – Uddhav Thackeray यांच्याकडूनही Maharashtra Bandh मागे; तोंडाला काळे फडके बांधून करणार निदर्शने)
रूबी हॉल क्लिनिककडून हा कक्ष चालविला जाणार आहे.पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलमध्ये आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला असून, अनेक ठिकाणी ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (एईडी) उपकरणे बसविण्यात आली आहेत. याचबरोबर रुग्णवाहिकाही (Ambulance) आपत्कालीन वैद्यकीय प्रसंगासाठी तैनात करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुणे विमानतळ प्रशासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community