पुण्यातील काही रिक्षा संघटनांकडून सोमवारी रिक्षा बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात रिक्षा बंद राहणार आहेत. दुचाकीवरील प्रवासी वाहतूकीला विरोध दर्शवत रिक्षा संघटनांनी सोमवारी रिक्षा बंद आंदोलन पुकारले आहे. तसेच, 11 वाजता आरटीओ कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशाराही रिक्षासंघटनांकडून देण्यात आला आहे.
पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरातील बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात रिक्षा संघटना आक्रमक झाल्या असून, त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. दुचाकीवरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी पुण्यातील काही रिक्षा संघटनांकडून सोमवारी रिक्षा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
( हेही वाचा: ३० प्रवासी घेऊन जाणाऱ्या एसटी ड्रायव्हरला आली चक्कर आणि पुढे काय झाले वाचा… )
याआधीही घेतली होती आक्रमक भूमिका
बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापूर्वी 28 नोव्हेंबर रोजी ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनाने बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात बेमुदत संप पुकारला होता. त्यावेळी प्रशासनातील अधिकारी आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आश्वासनानंतर रिक्षा संघटनांनी हा संप स्थगित केला होता.
Join Our WhatsApp Community