पुण्यात बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात ऑटो-रिक्षा चालक आक्रमक होत त्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. बेकायदा बाईक, टॅक्सी बंद व्हावी म्हणून पुण्यात रिक्षाचालकांचा बेमुदत संप आहे. पुण्यात एकूण १२ रिक्षाचालक संघटना आहेत. या रिक्षा चालकांनी आक्रमक भूमिका घेत या सगळ्या संघटना बाईक टॅक्सी बंदच्या विरोधात एकत्र आल्या आहेत. त्यांनी एकत्रितरित्या हा बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा फटका पुणेकरांना बसण्याची शक्यता आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बाईक टॅक्सी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने याचा फटका रिक्षा चालकांना बसतो. मोठ्या प्रमाणात बाईक टॅक्सी असल्याने ऑटो रिक्षा चालकांना भाडं मिळणं कठीण होतं. इतकेच नाही तर याचा परिणाम त्यांच्या कमाईवर देखील होतो. गेल्या काही दिवसांपूर्वी बेकायदा बाईक टॅक्सी बंद करण्याची मागणी ऑटो रिक्षा चालकांकडून करण्यात आली होती. यावेळी त्यांनी काही प्रमाणात आंदोलनही केले होती. मात्र त्यांची मागणी मान्य न झाल्याने आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून या संपात एकूण १२ रिक्षा चालक संघटना सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे अनेक रिक्षा चालक या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे याचा फटका विद्यार्थ्यांसह पालकांना देखील बसणार आहे.
(हेही वाचा – ‘या’ राज्यात बिडी-सिगरेटच्या नशेत मुली आघाडीवर, वयाच्या ७ व्या वर्षापासूनच मुली करतात धुम्रपान!)
PMPML कडून अतिरिक्त बस सेवा
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील रिक्षा संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला आहे. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून पीएमपीएमएलकडून देखील अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहे. लांब पल्ल्याच्या बस कमी करुन प्रवाशांची गर्दी पाहून बस संचलन करण्यात येणार असल्याचे पीएमपीएमएल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. रिक्षा चालकांच्या बेमुदत आंदोलनामुळे वाहतुकीची मोठी समस्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी, रूग्ण आणि सर्वसामान्यांना त्रास होऊ नये, यासाठी कायदेशीर मार्गाचा वापर करावा, त्याप्रमाणे आरटीओ कार्यालयाबाहेर गर्दी न करता सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करावे. नाहीतर रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी नोटीस पुणे बंडगार्डन पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community