बालगंधर्व रंगमंदिरातील देखभाल दुरुस्तीच्या काम महापालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी १६ फेब्रुवारी ते १६ मार्च या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.त्याबाबतचा प्रस्ताव सांस्कृतिक विभागाकडून महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.या कालावधीत प्रामुख्याने उन्हाळ्यापूर्वी वातानुकूलित यंत्रणा तसेच अंतर्गत दुरुस्तीची कामे, दिव्यांगासाठी स्वच्छतागृह उभारणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील आठवडाभर या कामांची तपासणी करून २५ मार्चच्या आसपास नाटयगृह पुन्हा सुरू केले जाईल, अशी माहिती विभागप्रमुख डाॅ. चेतना केरूरे यांनी दिली. (Pune)
शहरात महापालिकेची १४ सांस्कृतिक केंद्र आहेत. शहरातील सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक तसेच संस्था, राजकीय पक्षांना वेगवेगळया कार्यक्रमांसाठी ही नाट्यगृहे भाडेकराराने दिली जातात. त्यात, बालगंधर्व रंगमंदिर हे सर्वाधिक मागणी असलेले नाटयगृह आहे. येथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असल्याने तसेच नाट्यगृह जुने झाल्याने त्याचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला.
(हेही वाचा : Mumbai Fire Brigade : मुंबई अग्निशमन दलातील ६ जवानांना राष्ट्रपतींचे ‘गुणवत्तापूर्ण सेवा पदक’)
मात्र, त्याला विरोध झाल्याने तसेच पुनर्वसनाचा निर्णय होत नसल्याने येथे अनेक कामे रेंगाळली आहेत. त्यात प्रामुख्याने वातानुकूलीत यंत्रणेचा समावेश आहे. तसेच स्वच्छतागृह, खुर्च्या, स्टेज तसेच विद्युत विभागाशी संबंधित कामेही महिनाभरात केली जाणार आहेत. तर मनपा वर्धापनदिनाचे कार्यक्रमही दुसऱ्या सभागृहात घेतले जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community