अभिनेत्रीसह मित्राचा अपघाती मृत्यू! कोण आहे ‘ही’ अभिनेत्री?

नियतीने तिची सर्व स्वप्न हिरावून घेतली. या घटनेनं पुणे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुण्यातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि तिचा मित्र शुभम देगडे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. सोमवारी, २० सप्टेंबर रोजी गोव्यातील बागा-कलंगुट येथे गाडी खाडीत कोसळून ईश्वरी आणि शुभमचा मृत्यू झाला आहे.

असा झाला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, मृत शुभम आणि ईश्वरी पुण्यातून गोव्याला फिरायला गेले होते. दरम्यान सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास बागा-कलंगुट येथील अरुंद रस्त्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पुलावरुन सरळ खाडीत जाऊन कोसळली. अपघात झाल्यानंतर ईश्वरी आणि शुभम हे गाडीतच लॉक झाल्यामुळे अडकले. दोघांनी आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा अशी मदतीची साद घातली. मात्र त्यांच्या मदतीला कुणीच पोहचू शकले नाही आणि त्यातच दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत ईश्वरी ही पाषाण-सूस परिसरात वास्तव्याला असून, शुभम हा नांदेड सिटी परिसरातील रहिवासी होता.

(हेही वाचाः भयानक! बेपत्ता आई आणि मुलाच्या वहीत सापडले असे काही, ज्यामुळे…)

पुणे परिसरात हळहळ

विशेष म्हणजे, ईश्वरीने काही दिवसांपूर्वी तिची भूमिका असलेल्या मराठी आणि एका हिंदी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं होतं. या चित्रपटाची प्रदर्शनपूर्वीची काही कामं अद्याप बाकी होती. ईश्वरीला लहानपणापासून अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची आवड होती. त्यामुळे ती या क्षेत्राकडे वळली. पण नियतीने तिची सर्व स्वप्न हिरावून घेतली. या घटनेनं पुणे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ईश्वरी-शुभमचं नातं काय?

ईश्वरीने आजवर काही मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच ती हिंदी मालिकांमध्येही झळकली होती. काही दिवसांपूर्वी तिने मालिकांचे चित्रीकरण पूर्ण केले होते. ईश्वरी आणि शुभम हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. पुढच्या महिन्यात ते साखरपुडा करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

(हेही वाचाः अफगाणिस्तानातून भारतात आले तीन टन ‘हेरॉईन’! कसे? वाचा)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here