Pune Car Accident : पुण्यात मद्यपी कारचालकाने केली ‘संतोष माने’ प्रकाराची पुनरावृत्ती

115
Pune Car Accident : पुण्यात मद्यपी कारचालकाने केली 'संतोष माने' प्रकाराची पुनरावृत्ती
Pune Car Accident : पुण्यात मद्यपी कारचालकाने केली 'संतोष माने' प्रकाराची पुनरावृत्ती

पुण्यात मद्यपी कारचालकने भरधाव वेगात कर चालवून अनेकांना चिरडले. (Pune Car Accident) या घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्यातील झेड ब्रिज नारायण पेठेतील रस्त्याला जिथे येऊन मिळतो तिथे ही घटना घडली. नारायण पेठ पोलीस चौकीकडून झेड ब्रिजच्या दिशेने आलेल्या उमेश हनुमंत वाघमारे (वय 48) या कारचालकाने दोन रिक्षांना धडक दिली आणि काही पादचाऱ्यांना उडवले. नटराज बाबुराव सूर्यवंशी (वय 44) असे गाडीमालकाचे नाव आहे. (Pune Car Accident)

(हेही वाचा – Accident : नगर कल्याण महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात ,१५ ते २० प्रवासी गंभीर जखमी

दारुच्या नशेत असलेले  उमेश हनुमंत वाघमारे यांनी धडक दिल्याने एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर रिक्षा चालक आणि काही वाहनचालक जखमी झाले आहेत. या वेळी लोकांनी आधी कारचालकाला चोप दिला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

या प्रकाराने 2012 सालच्या संतोष माने प्रकरणाची आठवण करून दिली. 2012 मध्ये पुण्यातील स्वारगेट पीएमटी स्थानकातून एक बस पळवून नेत मनोरुग्ण असलेल्या संतोष माने या बसचालकाने 9 जणांना चिरडले होते. या घटनेत 37 जण जखमी झाले होते. (Pune Car Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.