Pune Car Accident : मी सर्वांची नावे घेईन; अटकेतील डॉ. तावरेंचा इशारा

Pune Car Accident : पोलिसांनी तावरे अन् श्रीहरी यांची कसून चौकशी सुरु केली. या चौकशीदरम्यान 'मी शांत बसणार नाही. मी सर्वांची नावे घेईन', असा इशारा डॉ. अजय तावरे यांनी दिला आहे.

355
Pune Car Accident : मी सर्वांची नावे घेईन; अटकेतील डॉ. तावरेंचा इशारा
Pune Car Accident : मी सर्वांची नावे घेईन; अटकेतील डॉ. तावरेंचा इशारा

पुण्यातील पोर्शे कार अपघात (Pune Porsche crash) प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्यामुळे ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उशिरा अटक केली आहे. दरम्यान पोलिसांनी तावरे अन् श्रीहरी यांची कसून चौकशी सुरु केली. या चौकशीदरम्यान ‘मी शांत बसणार नाही. मी सर्वांची नावे घेईन’, असा इशारा डॉ. अजय तावरे यांनी दिला आहे. (pune car accident)

(हेही वाचा – शरद पवारांना वाटणाऱ्या भीतीमुळे राष्ट्रवादीचा 2004 मध्ये मुख्यमंत्री झाला नाही; Ajit Pawar यांचा गौप्यस्फोट)

अतुल घटककांबळेला अटक

डॉ. अजय तावरे हे ससूनमध्ये फॉरेन्सीक लॅबचे प्रमुख आहेत. त्यांच्या फोन कॉलनंतरच आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. आता तपासात डॉ. तावरे कोणाची नावे घेणार, याकडे लक्ष लागले आहे. तावरेंनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी अतुल घटककांबळे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याशिवाय त्यानेच या डॉक्टरला पैसे पुरवल्याचे समोर आले आहे. त्यांनी या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीचेही नाव घेतले असून, त्या दृष्टीने तपास देखील केला जात आहे.

कल्याणीनगर कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठीअनेक स्तरांवर प्रयत्न करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सुरुवातीला पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींना ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर ससून रुग्णालयातील डॉक्टरांना पैसे देऊन थेट रक्ताचे नमुने बदलून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तो लोकप्रतिनिधी कोण?

पोर्शे कार अपघातानंतर अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी डॉ. अजय तावरे यांच्याशी संपर्क साधला होता. त्या वेळी एका लोकप्रतिनिधीने अल्पवयीन आरोपीला मदत केल्याचे डॉक्टर तावरे यांना सांगितल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. हे लोकप्रतिनिधी कोण आहेत, याचा तपास आता केला जात आहे.

कसा आला डॉक्टरांवर संशय ?

ससून रुग्णालयातून पहिलाच रिपोर्ट अल्पवयीन आरोपीने नशा न केल्याचा आल्याने संशय बळावला. 11 वाजल्यानंतर आलेल्या प्राथमिक अहवालात अल्पवयीन आरोपीने नशा न केल्याचा रिपोर्ट आला. त्यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने घेतले.

खबरदारी म्हणून दुसरी वैद्यकीय तपासणी आणि डीएनए टेस्ट औंधमधल्या सरकारी रुग्णालयात करण्यात आली. औंधमधल्या सरकारी रुग्णालयात वडिलांचेही रक्ताचे नमुने पोहोचवण्यात आले. औंधमध्ये झालेल्या तपासणीत दुसऱ्यांदा घेतलेले रक्त आणि वडिलांचे डीएनए जुळल्याचे समोर आले.

मात्र पहिले रक्ताचे नमुने दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी पाहिले रक्ताचे नमुने घेणाऱ्या डॉ. श्रीहरी हळणोरला अटक केली. श्रीहरी हळणोरने पोलिसांच्या चौकशीत अजय तावरे यांच्या सांगण्यावरून रक्ताचे नमुने बदलले असल्याचे सांगितले. पुणे पोलिसांनी अखेर रात्री उशिरा डॉ. अजय तावरे यांनाही अटक केली. (pune car accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.