बकरी ईदनिमित्त पुण्यातील (PUNE) सोमवारी, (१७ जून) गोळीबार चौक भागातील रस्ते वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
येथील गोळीबार चौकातील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. हीच बाब लक्षात घेता पोलिसांकडून वाहतुकीत बदल केले जातात. गोळीबार मैदान चौक, मम्मादेवी चौक, ढोले पाटील चौक परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे तसेच गोळीबार मैदान चौकातून शंकरशेठ रस्तामार्गे स्वारगेटकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. वाहनचालकांनी गोळीबार मैदान चौकातून वळून सीडीओ चौकातून उजवीकडे वळून गुलटेकडीमार्गे इच्छितस्थळी जाता येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
(हेही वाचा – Nanded to Pune Flight: नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी; जूनच्या ‘या’ तारखेपासून नांदेड ते पुणे विमानसेवा सुरू होणार )
पुण्यातील ‘हे’ रस्ते वाहतुकीसाठी राहणार बंद
- सीडीओ चौकातून गोळीबार मैदानाकडे येणारा रस्ता सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत वाहतुकीस बंद असेल.
- कोंढवामार्गे येणाऱ्या वाहनांनी खटाव बंगला चौक, मम्मादेवी चौक किंवा वानवडी बाजार, भैरोबा नाला चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
- गोळीबार मैदान चौकाकडे येणारी शंकरशेठ रस्त्यावरील ढोले पाटील चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
- वाहनचालकांनी सॅलिसबरी पार्क, सीडीओ चौक, भैरोबानाला चौक या पर्यायी मार्गाचा वापर करून इच्छितस्थळी जावे.
- सोलापूर रस्त्याने गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक मम्मादेवी चौक, बिशप स्कूलमार्गे किंवा नेपियर रस्तामार्गे, सीडीओ चौकातून वळवण्यात आली आहे.
- कोंढवा परिसरातून येणाऱ्या सर्व वाहनांची वाहतूक एम्प्रेस गार्डन आणि लुल्लानगरकडे वळविण्यात येणार आहे.
हेही पहा –