यंदा महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने पाण्याचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. येत्या उन्हाळ्यात पाण्याअभावी अनेक समस्या गंभीर स्वरूप धारण करणार आहेत. नागरिकांनी दुष्काळग्रस्त स्थितीत पाण्याचा जपून वापर करावा. त्याचबरोबर शासनाने लोकांमध्ये जनजागृती करून उपलब्ध जलसाठ्याचे संरक्षण करून पाणी वापराचे काटेकोर नियोजन करावे, असे आवाहन भाजप नेते बाबाराजे जाधव यांनी केले.
दिवे (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायत हद्दीतील जाधववाडी येथे जलजीवन मिशनअंतर्गत १९ कोटी रुपये योजनेच्या पाईपलाईनच्या कामाचे भूमिपूजन जाधव यांच्या हस्ते केले. यावेळी ते बोलत होते.
(हेही वाचा – Shatabdi Express : शताब्दी एक्स्प्रेसमध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मान; प्रवाशांकडून रेल्वेचे कौतुक)
यावेळी सरपंच योगेश काळे, उपसरपंच शोभा लडकत, माजी सरपंच अमित झेंडे, गुलाब झेंडे, माजी उपसरपंच भारती आढाळगे, ग्रामपंचायत सदस्य नीलेश जाधवराव, राजेंद्र काळे, योगेश बाळा काळे, ऋषिकेश जाधवराव, अतुल जाधव, विठ्ठल जाधवराव, नारायण जाधवराव, दत्ता जाधवराव, आनंद आढाळगे, निखिल आढाळगे, बाबा काळे, स्वप्नील काळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे ऋषिकेश जाधवराव यांनी प्रास्ताविक केले. निखिल आढाळगे यांनी सूत्रसंचालन केले; तर नीलेश जाधवराव यांनी आभार मानले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community