Pune Crime : दौंडमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भकांचे अवयव; महिला आयोगाच्या ट्वीटनंतर खळबळ

39

पुणे जिल्ह्यातील दौंड शहरालगत असणाऱ्या बोरावकेनगर भागामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये सहा ते सात अर्भके आढळून आली आहेत. (Pune Crime) प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये भरून ही अर्भके कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये फेकण्यात आल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. कचऱ्यामध्ये सहा ते सात बरण्यांमध्ये भरून हे अभ्रक उघड्यावर फेकून दिल्याचे समोर आले होते. याचा तपास पोलिस करत आहेत.

(हेही वाचा – शिवसेनेच्या आमदाराकडून Kunal Kamra च्या ‘माज’वर कारवाईचा इशारा)

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत आहे. महिला आयोगाने सोशल मिडियावर पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली आहे. हे मानवी अवशेष रुग्णालयाकडे अभ्यासासाठी २०२० पासून आहेत आणि नजरचुकीने कचऱ्यात गेले अशी प्राथमिक माहिती आहे.

महिला आयोगाने आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये लिहलं आहे की, पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात बोरावकेनगर मध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भक आणि मानवी अवशेष सापडल्याची बातमी माध्यमातून समोर आली आहे. सद्यस्थितीत दौंड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून डॉक्टरांच्या पथकामार्फत तपासणी केली आहे. पोलिसांनी याचा तपास आणि रुग्णालयाची चौकशी सुरू केली आहे.

स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करून या संदर्भातील माहिती दिली. यानंतर तातडीने दौंड पोलीस (Daund Crime News) घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी अंती पंचनामा करून डॉक्टरांचे वैद्यकीय पथक या ठिकाणी बोलावले. हे अर्भक आणि अवशेष ताब्यात घेण्यात आले असून हे या ठिकाणी कसे आले? कोणी टाकले? हा गर्भपाताचा प्रकार आहे का? याचा शोध आता घेतला जात आहे. (Pune Crime)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.