सिंहगड रस्ता – भोर फाट्यापर्यंत जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहनांकडून खेड शिवापूर येथे टोल न घेता मोफत जाऊ द्यावे. २५ किलोमीटरसाठी ८० किलोमीटरचा टोल आकारू नये. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
टोल माफ करण्याबाबत कोणतेही निर्देश अथवा सूचना आम्हाला मिळालेल्या नाहीत. २० किलोमीटरच्या परिघात ३३० रुपयांत स्थानिक पास देण्यात येतो. येथील नागरिकांनी मासिक पास काढून घ्यावेत, असे आवाहन पुणे टोल रोड प्रा. लि.चे व्यवस्थापक अमित भाटिया यांनी केले आहे.
(हेही वाचा – Mumbai Local Train Update: मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; बोरिवलीतील फलाट क्रमांक १ आणि २ सेवा ठप्प! )
एम. एच. १२, एम. एच. १४ परवाना असलेल्या वाहनांना सवलत
खेड-शिवापूर टोलनाका भोर हद्दीच्या पुढे होणे आवश्यक आहे. येथे एम. एच. १२, एम. एच. १४ परवाना असलेल्या वाहनांना सवलत द्यावी, अशी मागणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community