पीएमआरडीए प्रारुप विकास आराखड्यातील (डीपी) वाघोली विकसन केंद्रातील दहा गावांतील नागरिकांनी दाखल केलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्यास सुरुवात झाली. केसनंद व तळेरानवाडी येथील 720 नागरिकांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यापैकी 482 नागरिकांनी सुनावणीला उपस्थित लावून म्हणणे समितीसमोर मांडले.
सुनावणीची प्रक्रिया मागील आठवड्यापासून सुरूवात
पीएमआरडीच्या प्रारूप विकास आराखड्यावर दाखल झालेल्या 61 हजार हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया मागील आठवड्यापासून सुरूवात झाली आहे. प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील कार्यालयामध्ये सुनावणी घेण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात रांगणगाव केंद्रातील चार गावांतील हरकतीधारकांची सुनावणी पूर्ण झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात वाघोली विकसन केंद्रातील केसनंद, तळेरानवाडी, वाघोली, लोणीकंद, पेरणे, आव्हाळवाडी, भावडी, बकोरी, फुलगाव आणि वढू खुर्द या गावांतील नागरिकांनी दाखल केलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्यास सुरुवात झाली आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
(हेही वाचा नंदकिशोर चतुर्वेदींचा मनसुख हिरेन केला नाही ना? नितेश राणे)
Join Our WhatsApp Community