राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत जानेवारी महिन्याच्या सुरूवातील झपाट्याने वाढ झाली. यानंतर तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आता मात्र राज्यातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत दिलासादायक चित्र निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे.
तब्बल दोन वर्षांनंतर पुण्यातील रूग्णसंख्या पहिल्यांदाच १ हजारपेक्षा कमी झालेली आहे. मार्च २०२० मध्ये पुण्यात पहिल्या कोरोना रूग्णाची नोंद झाली होती. त्यानंतर पुढील तीन महिन्यांत कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत जात पुणे जिल्हा हा कोरोनाग्रस्तांचा हॉटस्पॉट ठरला आहे.
( हेही वाचा : दुर्दैवी! शौचालयाची टाकी साफ करताना तीन तरूण टाकीत पडले… )
कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर
पहिल्या व दुसऱ्या लाटेत रूग्ण बरे होण्याची आकडेवारी २९ टक्के होती यात सुधारण होऊन तिसऱ्या लाटेदरम्यान हा आकडा ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला. २०२१ मध्ये सर्वांत कमी ९८ रूग्ण २५ जानेवारीला नोंदवले गेले होते. त्यानंतर २०२२ मध्ये गेल्या दोन वर्षांतील सर्वात कमी ४४ रूग्ण सोमवारी पुणे जिल्ह्यात नोंदवले गेले आहेत. त्यामुळे लवकरत पुणे जिल्हा कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे.
तिसऱ्या लाटेचा प्रभाव आता हळूहळू कमी होत असून, राज्यातील मृत्यूदर केवळ १.८२ टक्के नोंदवला गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली असून राज्यात मंगळवारी ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही तिसऱ्या लाटेची नीचांकी नोंद आहे.
Join Our WhatsApp Community